भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा भव्य सत्कार करण्याची योजना आखली आहे.
बुधवारीपासून संघ घरी पतरण्यास सुरुवात होईल. अद्याप या समारंभाचे तारीख आणि स्थळ निश्चित करण्यात आले नाही, खेळाडूंच्या सोयीनुसार ते ठरवण्यात येईल.
समारंभात खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे धनादेश देण्यात येणार असून सहाय्यकांना प्रत्येकी २५ लाख रुपये दिले जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी खेळाडूंच्या भेटीसाठीही प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधानांनी १२ वर्षांनंतर भारताला प्रथम अंतिम फेरीत प्रवेश करण्याऱ्या महिला क्रिकेटपटूंचे ट्विटर वर भरपूर कौतुक केले आहे.