आयपीएल २०२१ चा १४ हंगाम खेळाडूंना झालेल्या कोरोना संक्रमणामुळे मे महिन्यात अर्ध्यातूनच स्थगित करण्यात आला होता. यानंतर १४ व्या हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. युएईतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघ युएईमध्ये दाखल झाले आहेत. अशात बीसीसीआयने आयपीएल उर्वरित सामन्यांच्या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेललेला आहे.
बीसीसीआयने ज्या खेळाडूंनी १४ व्या हंगामातून दुखापतीमुळे माघार घेतली होती, त्यांना संघ यूएईमध्ये उर्वरित सामन्यांसाठी संधी देऊ शकतो असा निर्णय घेतला आहे. जर दुखापतग्रस्त खेळाडूने स्पर्धेत पुनरागमन केले तर त्याच्याऐवजी जो बदली खेळाडू संघाने घेतलेला होता, तो स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. दुखापतग्रस्त खेळाडूंचा विचार केला तर सनरायजर्स हैद्राबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर हे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकतात.
आयपीएलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हेमांग अमीन यांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार जे खेळाडू बदली खेळाडूंच्या रुपात आयपीएलचच्या १४ व्या हंगामात सहभागी केले गेले होते; त्यांना स्पर्धेच्या उर्वरीत सामन्यांत सहभागी केले जाणार नाही. पण आयपीएलच्या नोंदणीकृत खेळाडूंमध्ये त्यांचा सहभाग असेल. पण जर संघाने एखाद्या नव्या खेळाडूला आणले तर त्या खेळाडूंना नोंदणीकृतांमध्येही सहभागी होता येणार नाही.
बदली खेळाडू किंवा दुखापत झालेला खेळाडू यांच्यातील एकालाच संधी मिळनार आहे. अमीनने याआधीच संघांना बदली खेळाडूंची यादी सुपूर्त करायला सांगितले आहे, ज्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट आहे. अमीन म्हणाले, “जर कोणी खेळाडू भारतात झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त होता आणि स्पर्धेतून बाहेर झाला होता; तर तो आता यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतो. मात्र हे संघावर अवलंबून आहे की, दुखापत झालेल्या खेळाडूला सहभागी करयचे आहे की बदली खेळाडूला. पण ते दोघांपैकी एकालाच सहभागी करू शकतात.”
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला आयपीएल २०२१ सुरू होण्यापूर्वी खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून मागार घ्यावी लागली होती. अय्यर स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे त्याच्या गैरहजेरीत रिषभ पंतने संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. रिषभ पंतने त्याच्या नेतृत्वखाली दिल्लीच्या संघाला ८ मधल्या ६ सामन्यांत विजय मिळवून दिला.
जर श्रेयस अय्यरने स्पर्धेत पुनरागमन केले तर संघ व्यवस्थापनासमोर संघाच्या कर्णधारपदाचा प्रश्न निर्माण होईल. सनरायजर्स हैद्राबादच्या टी नटराजनला स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. जर नटराजनने स्पर्धेत वापसी केली तर संघाला चांगलीच मजबूती मिळेल. सध्या नटराजनचा हैद्राबाद संघ स्पर्धेत सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एका ग्राउंड ऑफिसरने शमी, बेयरस्टोसहित पंचांनाही थकवलं, व्हिडिओ बघून आवरणार नाही हसू
जो रूटपुढे भारताची गोलंदाजी खिळखिळी, कर्णधार कोहलीच्या ‘त्या’ निर्णयाचे भारताला भोगावे लागणार फळ?
चक्क ‘बिग बी’ अमिताभ बच्चनने लावली लॉर्ड्स कसोटीत हजेरी, हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल असचं