---Advertisement---

विराटने का सोडलेले टीम इंडियाचे नेतृत्व? बीसीसीआयमधील जबाबदार व्यक्तीने केला गौप्यस्फोट

On: गुरूवार, ऑगस्ट 4, 2022 11:57 PM
virat-kohli-captain
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा सातत्याने चर्चेत असतो. त्याने अनेक वर्ष भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. मात्र, मागील वर्षी अचानक त्याने आपल्या टी२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याने कसोटी कर्णधारपदही सोडण्याचा निर्णय घेतलेला. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खजिनदार अरुण धुमल यांनी याबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. त्यावेळी त्यांना विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्या वेळच्या घडामोडींबाबत विचारले गेले. त्यावेळी त्यांनी काही महत्त्वाचे खुलासा केले. धुमल म्हणाले,

“जोपर्यंत कर्णधारपदाचा प्रश्न आहे, तो त्याचा निर्णय होता. त्याने ठरवले की मला आता कर्णधारपद नको आहे. विश्वचषकानंतर हा निर्णय घेणे एखाद्याला सोपे वाटले असते. कदाचित त्याने वेगळा विचार केला असावा. त्याला नेतृत्व सोडायचे होते आणि तो पूर्णपणे त्याचा निर्णय होता. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर केला. त्याने भारतीय क्रिकेटमध्ये इतकं योगदान दिलं आहे की क्रिकेट बोर्डातील प्रत्येकजण त्याचा आदर करतो. विराटला मैदानावर पुन्हा एकदा तशाच प्रकारे खेळताना पाहायला आम्हाला नक्कीच आवडेल.”

गतवर्षी टी२० विश्वचषकापूर्वी त्याने टी२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्याच्या जागी रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला वनडे कर्णधारही बनवत कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्यावेळी बीसीसीआयने असे कारण दिले होते की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन कर्णधार असू शकत नाहीत. यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला आणि कसोटी मालिकेवेळी कोहलीने कर्णधारपद सोडले होते. तेव्हापासून तो फक्त फलंदाज म्हणून भारतीय संघात खेळत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

विराटला सतत विश्रांती देण्यावरून भडकला भारतीय दिग्गज; म्हणाला, “त्याने आता सरळ…”

आशिया कपचे आयोजनस्थळ बदलूनही श्रीलंका क्रिकेट बोर्ड कमावणार रग्गड पैसा

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---