---Advertisement---

टीम इंडिया 17 शहरांमध्ये खेळणार 22 सामने! बीसीसीआयने घरच्या हंगामाचे वेळापत्रक केले जाहीर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध…

On: गुरूवार, मार्च 26, 2026 3:31 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) भारताच्या वरिष्ठ पुरुष संघ २०२६-२७ या वर्षातील आंतरराष्ट्रीय घरच्या हंगामाचे वेळापत्रक गुरूवारी (२६ मार्च) जाहीर केले आहे. या मोठ्या आणि वेगवेेगळ्या स्वरुपाच्या वेळापत्रकात वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया अशा चार पाहुण्या संघांचा समावेश आहे. या हंगामात १७ शहरांमध्ये एकूण २२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. त्यामुळे देशभरातील चाहत्यांना उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

यामध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे वनडे मालिका आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका विशेष असणार आहेत. भारतात २५ वर्षांनंतर भारत विरुद्ध झिम्बाब्वे वनडे मालिका खेळली जाणार आहे.

या हंगामाची सुरुवात २७ सप्टेंबर २०२६ ला वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याने होणार आहे. या दौऱ्यात तीन वनडे सामन्यांची मालिका आणि त्यानंतर पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. वनडे सामने तिरुवनंतपुरम, गुवाहाटी आणि न्यू चंदीगड येथे खेळले जातील. त्यानंतर टी-२० सामन्यांचा थरार लखनऊ, रांची, इंदोर, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांमध्ये रंगणार आहेत.

डिसेंबर २०२६ मध्ये भारत श्रीलंका संघासाठी यजमानपद भूषवेल. यामध्ये प्रत्येकी तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांचा समावेश आहे. वनडे सामने दिल्ली, बंगळुरू आणि अहमदाबाद येथे खेळले जातील, तर टी-२० सामन्यांचे आयोजन राजकोट, कटक आणि पुणे येथे करण्यात आले आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच जानेवारी २०२७ मध्ये झिम्बाब्वेचा संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर येईल. हे सामने कोलकाता, हैदराबाद आणि मुंबई येथे खेळले जातील.

या हंगामाचा समारोप अत्यंत प्रतिष्ठित आणि बहुप्रतिक्षित अशा ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ने होईल. या अंतर्गत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. याची सुरुवात २१ जानेवारी २०२७ रोजी नागपूर येथे होईल. त्यानंतर या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईमध्ये (२९ जानेवारी ते २ फेब्रुवारी), तिसरा सामना गुवाहाटीमध्ये (२२ ते १५ फेब्रुवारी), चौथा सामना रांचीमध्ये (१९ ते २३ फेब्रुवारी) आणि अहमदाबादमध्ये पाचवा सामना (२७ फेब्रुवारी ते ३ मार्च) खेळला जाणार आहे. जागतिक क्रिकेटमधील दोन अव्वल संघांमधील या लढतीचा थरार अनुभवण्याची संधी चाहत्यांना मिळेल.

वेस्ट इंडिजचा भारत दौरा
वनडे मालिका-
पहिला सामना – २७ सप्टेंबर, २०२६ (तिरुअंतपुरम)
दुसरा सामना – ३० सप्टेंबर, २०२६ (गुवाहाटी)
तिसरा सामना – ३ ऑक्टोबर, २०२६ (न्यू चंदीगड)

टी२० मालिका
पहिला सामना – ६ ऑक्टोबर, २०२६ (लखनऊ)
दुसरा सामना – ९ ऑक्टोबर, २०२६ (रांची)
तिसरा सामना – ११ ऑक्टोबर, २०२६ (इंदोर)
चौथा सामना – १४ ऑक्टोबर, २०२६ (हैद्राबाद)
पाचवा सामना – १७ ऑक्टोबर, २०२६ (बंगळुरू)

श्रीलंकेचा भारत दौरा
वनडे मालिका

पहिला सामना – १३ डिसेंबर, २०२६ (दिल्ली)
दुसरा सामना – १६ डिसेंबर, २०२६ (बंगळुरू)
तिसरा सामना – १९ डिसेंबर, २०२६ (अहमदाबाद)

टी२० मालिका
पहिला सामना – २२ डिसेंबर, २०२६ (राजकोट)
दुसरा सामना – २४ डिसेंबर, २०२६ (कटक)
तिसरा सामना – २७ डिसेंबर, २०२६ (पुणे)

झिम्बाब्वेचा भारत दौरा
वनडे मालिका

पहिला सामना – ३ जानेवारी, २०२७ (कोलकाता)
दुसरा सामना – ६ जानेवारी, २०२७ (हैद्राबाद)
तिसरा सामना – ९ जानेवारी, २०२७ (मुंबई)

बॉर्डर-गावस्कर ट्राॅफी २०२७ वेळापत्रक
पहिली कसोटी – २१ ते २५ जानेवारी (नागपूर)
दुसरी कसोटी – २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी (चेन्नई)
तिसरी कसोटी – २२ ते १५ फेब्रुवारी (गुवाहाटी)
चौथी कसोटी – १९ ते २३ फेब्रुवारी (रांची)
पाचवी कसोटी – २७ फेब्रुवारी ते ३ मार्च (अहमदाबाद)

या मालिकांमधील वनडे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजता आणि टी२० सामने संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले दोन आणि नंतरचे दोन कसोटी सामने सकाळी ९.३० वाजता सुरू होतील, तर तिसरा सामना जो गुवाहाटीला खेळला जाणार आहे तो सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.

तसेच भारत मे २०२७ पर्यंत २० वनडे सामने खेळणार आहेत. यामध्ये अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्ध प्रत्येकी ३-३ सामने खेळणार असून न्यूझीलंडविरुद्ध ५ वनडे सामने खेळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---