भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) टीम इंडियातील खेळाडूंसाठी एक नवीन आदेश आला आहे. बोर्डानं भारताच्या स्टार खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केलं की, राष्ट्रीय संघातील खेळाडू जेव्हाही मोकळे असतील, तेव्हा त्यांना देशांतर्गत क्रिकेटसाठी उपलब्ध असावं. मात्र, यातून तीन खेळाडूंना सूट मिळाली आहे.
अहवालात पुढे म्हटलं आहे की, आगामी दुलीप ट्रॉफीमध्ये कसोटी संघातील खेळाडूंनी किमान एक सामना खेळावा अशी बोर्डाची इच्छा आहे. भारताला ऑगस्टमध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. अशा स्थितीत दुलीप ट्रॉफीद्वारे खेळाडूंची तयारी होईल.
असं असलं तरी, बीसीसीआयचा हा निर्णय रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना लागू होणार नाही. वास्तविक, बोर्डानं या तीन खेळाडूंना सूट दिली आहे. या तिन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळायचं की नाही हे स्वत: ठरवावं, असं बोर्डाचं म्हणणं आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की, बोर्ड या तिन्ही खेळाडूंवर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणार नाही.
रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, यावेळी टीम इंडियाचे निवडकर्तेच दुलीप ट्रॉफीसाठी खेळाडूंची निवड करतील. वास्तविक, दुलीप ट्रॉफीसाठी प्रादेशिक निवड समिती नाही. यामध्ये सर्व कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंची निवड केली जाईल. मात्र, रोहित, कोहली आणि बुमराह यांना यामध्ये खेळायचं की नाही, हे ते स्वत: ठरवतील.
गेल्या वर्षी बीसीसीआयनं श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितलं होतं. या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतला नाही, म्हणून बीसीसीआयनं त्यांना बोर्डाच्या केंद्रीय करारातून वगळलं होतं. त्यानंतर या दोघांनी रणजी ट्रॉफीमध्ये भाग घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी होते टीम इंडियाचे मॅचविनर खेळाडू…आता संधीसाठी झगडत आहेत! निवृत्ती हाच शेवटचा पर्याय
“रोहित शर्मा खूश नव्हता…”, आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या वादावरून दिग्गज गोलंदाजाचा मोठा दावा
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतासाठी ओपनिंग कोण करणार? हे 4 दावेदार रेसमध्ये