इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र एकदिवसीय मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर झालेला नाही. बीसीसीआय लवकरच एकदिवसीय मालिकेसाठी बैठक घेऊ शकते. परंतु त्यापूर्वी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनसाठी वाईट बातमी समोर येत आहे.
आतापर्यंत संजू सॅमसनकडे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विकेटकीपर म्हणून पाहिलं जात होतं. पण आता त्याच्या अडचणी वाढू शकतात. इंग्लंड मालिकेव्यतिरिक्त त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही वगळलं जाऊ शकतं. संजू सॅमसननं सध्या जारी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत भाग घेतलेला नाही. त्याच्या या निर्णयावर बीसीसीआय खूप नाराज आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. बोर्डाला आता टीम इंडियाच्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व द्यावं असं वाटतं. रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, संजू सॅमसननं केरळ क्रिकेट असोसिएशनला सांगितलं होतं की तो विजय हजारे ट्रॉफीच्या तयारीसाठी कॅम्पमध्ये येऊ शकणार नाही. यानंतर केसीएनं त्याला स्पर्धेतून वगळलं, ज्यामुळे वाद वाढला. खरंतर, संजू सॅमसन आणि केरळ क्रिकेट असोसिएशनमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या निवड समितीला संजू सॅमसनकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये न खेळण्यामागचं खरं कारण जाणून घ्यायचं आहे. जर बोर्डाचं त्याच्या उत्तरानं समाधान झालं नाही, तर आगामी एकदिवसीय सामन्यांसाठी त्याच्या अडचणी वाढतील. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, ‘सॅमसनचा केरळ क्रिकेट असोसिएशन सोबत दीर्घकाळापासून वाद आहे. पण यामुळे तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेत नाही हे शक्य नाही. त्यांना गैरसमज दूर करावे लागतील आणि नंतर सॅमसनला खेळावं लागेल. विशेष म्हणजे, संजूनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या स्थानिक टी20 स्पर्धेत भाग घेतला होता.
हेही वाचा –
रणजी ट्रॉफीपूर्वी विराट कोहली दुखापतग्रस्त, महत्त्वाच्या सामन्यात खेळणार की नाही?
आयपीएल 2025 पूर्वी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू दुखापती
नितीश कुमार रेड्डीचं नशीब चमकलं, मुख्यमंत्र्यांकडून मिळालं लाखोंचं बक्षीस