१७ ऑगस्टपासून भारतातील २०१८-१९ च्या देशांतर्गत क्रिकेट मोसमाला दुलीप ट्रॉफीच्या माध्यमातून सुरवात होणार आहे.
यावेळी विजय हजारे ट्रॉफीला १७ सप्टेंबरला सुरवात होत आहे. तर देवधर ट्रॉफीची सुरवात २३ ऑक्टोबर होईल.
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्याल्या रणजी ट्रॉफीला १ नोव्हेंबर पासून सुरवात होणार आहे.
यावर्षी बीसीसीआयने ९ नव्या संघाचा रणजी ट्रॉफीमध्ये समावेश केल्याने एकून संघाची संख्या ३७ झाली आहे.
यावेळी रणजी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाना ए, बी आणि सी या गटात विभागले जणार आहे. यातील ए आणि बी गटामध्ये ९ संघ असतील तर सी गटात १० संघाचा समावेश असेल.
या स्पर्धेत समाविष्ट करण्यात आलेल्या अरुणाचल प्रदेश, बिहार, मणिपुर, मेघालय, मिझोराम, नागालॅंड, पुडुचेरी, सिक्किम आणि उत्तराखंड या ९ नविन संघाना प्लेट गटात ठेवण्यात आले आहे.
या ९ संघातील जो संघ उपांत्य पूर्व फेरी गाठेल त्या संघाला पुढच्या मोसमात सी गटात जागा देण्यात येणार आहे.
यामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ महिला आणि पुरुषांच्या सर्व वयोगटातील तब्बल २००० सामन्यांचे आयोजन करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक: एमबाप्पेने केलेल्या त्या गोलची ट्विटरवर सर्वाधिक चर्चा
-एशियन गेम्स २०१८: भारत कबड्डीत सलग आठवे सुवर्ण पदक मिळवेल, कर्णधार अजय ठाकूरने व्यक्त केला विश्वास