बीसीसीआयने पंजाब किंग्स सोडून सर्व आयपीएल संघांना मंगळवार पर्यंत त्यांच्या- त्यांच्या ठरलेल्या स्थळांवर रिपोर्ट करण्यासाठी सांगितले आहे. बोर्डाने सर्वांना सांगितले आहे की, ते लवकरच नवीन वेळापत्रक बनवून आणि आयपीएल स्पर्धा लवकरात लवकर सुरू करण्याची योजना बनवत आहेत. बीसीसीआयने फ्रेंचाईजींना त्यांच्या विदेशी खेळाडूंना परत बोलावण्याच्या योजनांबद्दलही कळवण्यास सांगितले आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, शुक्रवार रोजी आयपीएल स्थगित केल्यानंतर विदेशी खेळाडू आणि सहयोग स्टाफ त्याच संध्याकाळी त्यांच्या देशात रवाना झाले. पण आता आयपीएल पुन्हा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना परत भारतात बोलावण्यासाठी व्यवस्थेची तयारी केली जात आहे.
असे सांगितले जात आहे की, बीसीसीआयने फ्रेंचाईजींना मंगळवार पर्यंत रिपोर्ट करण्यासाठी यासाठी सांगितले आहे, कारण ते आयपीएल स्पर्धा निर्धारित तारीख म्हणजेच 25 मे रोजी पूर्ण करण्याची योजना करत आहेत. स्पर्धेमध्ये अजून 16 सामने उरले आहेत, त्यामुळे डबल हेडर सामने घेऊन पुन्हा स्पर्धा सुरू करण्याची योजना बीसीसीआय करत आहे.





