---Advertisement---

वरुण चक्रवर्तीवर BCCI कडून कारवाई, मोठा दंड ठोठावला!

On: गुरूवार, मे 8, 2025 9:05 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 मध्ये काल म्हणजेच 7 मे रोजी गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि 5 वेळा चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली चेन्नई सुपर किंग्स संघात सामना खेळण्यात आला. या सामन्यानंतर चेन्नईने विजय मिळवून केकेआरचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग जवळपास बंद केला आहे. तसेच या सामन्यानंतर केकेआरचा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीवर बीसीसीआयने दंड ठोठावला आहे.

बुधवार रोजी चेन्नईविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीवर आयपीएलमध्ये आचार संहितेचे उल्लंघन केल्यामुळे दोषी ठरवण्यात आल्यामुळे त्याच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. वरुणला आचार संहितेत दोषी मानल्यावर त्याने केवळ 1 गुन्हा मान्य केला. त्याच्याकडून सामन्याच्या शुल्कातील 25 टक्के पर्यंत दंड आकारण्यात आला आहे. तसेच त्याला एक डिमेरिट अंक देण्यात आला आहे.

चेन्नई विरुद्ध वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी केली, पण तरीही संघ विजय प्राप्त करू शकला नाही. या सामन्यात वरूणने 4 षटके गोलंदाजी करत 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

या सामन्याआधी प्रथम फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 6 विकेट देऊन 179 धावा केल्या. ज्यानंतर चेन्नईने हे आव्हान 19.4 षटकात 8 विकेट्स देऊन पूर्ण केले. चेन्नईसाठी या सामन्यात नूर अहमदने कमालीची गोलंदाजी केली 4 विकेट्स घेतल्या, ज्यासाठी त्याला सामनावीर हा पुरस्कार देखील देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---