भावंडामधलं नातं एक खास बंधन असते. भाऊ बहिणीच्या नात्याचा गोडवा तर शब्दांच्या पलीकडे असतो. हे पवित्र बंधन समजून घेण्यासाठी ते फक्त अनुभवले पाहिजे. आपले क्रिकेटपटू त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे नेहमी प्रवासात असतात. आपण नेहमी त्यांच्या प्रेयसी, कथित संबंध, बायका आणि इतर सदस्यांबद्दल बोलत असतो, पण त्यांच्या भावंडांबद्दल किंवा बहिणींबद्दल फार क्वचितच बोलतो. आज रक्षाबंधनाच्या औचित्याने आम्ही खास तुमच्यासाठी भारताच्या दहा क्रिकेटपटूच्या सुंदर आणि गुणी बहिणींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांना त्यांच्या जीवनात मजबूत बनण्यास बनण्यास मदत केली आहे.
राहुल, दीपक आणि मालती
राहुल आणि दीपक चाहर या दोघात सात वर्षांचे अंतर आहे आणि ते दोघी चुलत भाऊ आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक भावांच्या जोड्या खेळल्या आहेत. भारतातर्फे याआधी मोहिंदर आणि सुरिंदर अमरनाथ, इरफान आणि युसूफ पठाण, हार्दिक आणि कृणाल पंड्या या तीन जोड्या खेळल्या आहेत. राहुल आणि दीपक चाहर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतातर्फे खेळणाऱ्या चौथी भावांची जोडी बनली आहे.
राहुल आणि दीपक यांना एक बहिण आहे तिचे नाव मालती चाहर. मालती पेशाने मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 27 वर्षीय मालती आग्रा शहरात राहते. ती मिस फेमिना स्पर्धेत देखील सहभागी झाली होती. मालती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पण तिने करिअर म्हणून अभिनय आणि मॉडेलिंगची निवड केली. ती 2014 सालची मिस इंडिया दिल्ली, या स्पर्धेची विजेती राहिली होती. फेमिना मिस फोटोजेनिक आणि मिस सुडोकू या स्पर्धेत देखील ती दुसऱ्या स्थानावर राहिली होती.
शुभमन गिल आणि शहनील गिल
शुभमनचा जन्म पंजाबच्या फाजिल्का येथे झाला. त्याच्या कुटुंबाच्या मालकीची शेतजमीन तिथेच होती. त्याचे वडील, लखविंदर सिंग एक शेतकरी आहेत. त्यांना क्रिकेटपटू बनण्याची इच्छा होती पण ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. म्हणून त्यांनी आपला मुलगा शुभमन गिलला क्रिकेटपटू बनवण्याचा निर्णय घेतला. गिलच्या वडिलांना त्याच्या प्रतिभेची जाणीव होती, म्हणून त्यांनी कुटुंब मोहालीला हलवले आणि पीसीए स्टेडियमजवळ एक घर भाड्याने घेतले.
गिलच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, शुभमनला तीन वर्षांचा असल्यापासून क्रिकेटची आवड होती. “तो फक्त तीन वर्षांचा होता तेव्हापासून क्रिकेट खेळला. त्या वयातील मुले खेळण्यांसाठी हट्ट धरत असतात. पण, त्याने अशा गोष्टी कधीच विचारल्या नाहीत. त्याच्यासाठी ते फक्त बॅट आणि बॉल हेच सर्वस्व होते. तो रात्री बॅट आणि बॉल घेऊन झोपायचा.” त्याच्या बहिणीचे नाव शहनील गिल आहे. ती त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे.
अजिंक्य रहाणे आणि अपूर्वा रहाणे
भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आणि संघातील एक उत्तम फलंदाज, शांत व्यक्तित्त्व असलेला खेळाडू म्हणजे अजिंक्य रहाणे. अजिंक्य रहाणेच्या बहिणीचे नाव अपूर्वा आहे आणि त्यांचे एकमेकांशी खूप गोड नाते आहे.
गौतम गंभीर आणि एकता गंभीर
गौतम आणि त्याची बहीण एकता खूप चांगले मित्र आहेत. तो तणावात किंवा कोणत्यात समस्येत फसला असेल तर आधी आपल्या बहिणाला भेटतो. तो नेहमी त्याच्या बहीन एकताचा सल्ला घेतो. जेव्हा जेव्हा तो निराश होतो, तेव्हा तो एकताकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जातो. एकताच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गौतमने 2009 साली श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती.
विराट कोहली आणि भावना
विराट हा भारतीय क्रिकेट संघाचा रुबाबदार, देखणा खेळाडू म्हणून ओळखला जातो. विराटला फक्त एक सुंदर पत्नी अनुष्का शर्मा नाही तर त्याला भावना कोहली नावाची एक सुंदर बहीण देखील आहे. कोहलीची बहीण भावना तिच्या भावाच्या खूप जवळ आहे आणि जेव्हा विराट भारतात असेल तेव्हा ती रक्षाबंधनाचा सण खूप आनंदाने साजरा करते. मोठ्या बहिणीचा कोहलीही खूप आदर करतो. 2006 मध्ये लहान वयात वडिलांना गमावल्यानंतर त्याच्या बहिणीचा खूप मोठा आधार त्याला होता.
रवींद्र जडेजा आणि नैना जडेजा
रवींद्र जडेजाने वयाच्या 17 व्या वर्षी आपली आई गमावली होती. त्याची मोठी बहीण नैनाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडत रवींद्रच्या मागे खंबीर उभी राहिली. आईची जागा तिने भरून काढली. नैना कुटुंबाला मदत करण्यासाठी अहोरात्र झटली. तिचा भाऊ त्याचे स्वप्न साकार करू शकेल याची तिला खात्री होती. म्हणून रवींद्र नैनाच्या अगदी जवळ आहे.
हरभजन सिंग आणि त्याच्या पाच बहिणी
2001 मध्ये जेव्हा या हरभजन सिंगने खेळ सोडण्याचा जवळजवळ विचार केला आणि अमेरिकेत ट्रक-ड्रायव्हर बनण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्यासाठी हरभजन सिंगच्या बहिणींनी त्याला खूप मदत केली होती. शेवटी त्याची वेळ बदलली तो त्याच्या पाच बहिणींचे कायम ऋणात राहिलाय. करण प्रत्येक कठीण परिस्थितीत त्यांनी त्याला साथ दिली आहे. 2000 मध्ये त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर एक सामान्य भारतीय भावाप्रमाणे, हरभजनने त्याच्या सर्व बहिणींचे लग्न लावून दिले.
धोनी आणि जयंती गुप्ता
लहान असताना एमएस धोनीचे वडील त्याला नेहमी म्हणत क्रिकेटवर आपला वेळ वाया घालवू नको त्याऐवजी अभ्यासामध्ये डोकं घाल. पण धोनीची बहीण जयंती आणि आईनेच त्याला त्याच्या खेळासाठी प्रोत्साहित केले. जयंती व्यवसायाने शिक्षिका आहे आणि तिने धोनीला सतत पाठिंबा दिला आहे. त्याच्या बहिणीमुळे आज तो जगप्रसिद्ध खेळाडू बनला आहे.
शिखर धवन आणि श्रेष्ठा धवन
शिखर धवन हा भारतीय क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो, ज्याला ‘गब्बर’ म्हणूनही संबोधले जाते. त्याला एक सुंदर बहीण देखील आहे आणि तिचे नाव श्रेष्ठा आहे. समाजमाध्यमावर दरवर्षी रक्षाबंधनाचे फोटो शेअर करतो.
जसप्रीत आणि जुहिका बुमराह
जसप्रीत बुमराहला एक लहान बहीण आहे. तिचे नाव जुहिका बुमराह आहे. दोघांमध्ये खूप मैत्री आणि आदर आहेत. जसप्रीत बहीण जुहिकासोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असतो.
महत्त्वाच्या बातम्या-
रक्षाबंधन विशेष: जगातील प्रसिद्ध भाऊ जे देशासाठी खेळले एकत्र क्रिकेट
रक्षाबंधन विशेष: आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या