पाकिस्तान संघात मोठे खेळाडू गेलेत ज्यामधे वकार युनूस, वासिम अक्रम, शोएब अख्तर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. तसेच सध्याचा पाकिस्तानचा संघ अजूनच बलाढ्य झाल्याचे पाहायला मिळते. बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील संघाने मागील काही काळात क्रिकेटविश्वात खूप कारनामे केले आहेत. तसेच बाबरदेखील आयसीसीच्या फलंदाजांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. परंतु चाहत्यांना क्रिकेटपटूंबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याचीही ओढ असते. पाकिस्तान संघातील काही क्रिकेटपटूंच्या धर्मपत्नी इतक्या सुदंर आहेत की त्यांच्यासमोर बड्या अभिनेत्री देखील फिक्या पडतील. चला तर पाहूया…
१) मोहम्मद आमिर : पाकिस्तान संघाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज, मोहम्मद आमिर हा गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तान संघातून निवृत्ती घेतल्यामुळे चर्चेत आला होता. तसेच यापूर्वी देखील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकला होता. याच प्रकरणात त्याला अनेक वर्ष क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. तसेच त्याला तुरुंगात देखील टाकण्यात आले होते. इथेच त्याला प्रेम झाले होते. होय, त्याला इंग्लंडच्या तुरुंगात टाकण्यात आले होते. या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी त्याला ज्या वकीलाने मदत केली होती.
त्याने त्याच वकीलसोबत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विवाह केला होता. त्याची पत्नी नरगीस ही मूळची पाकिस्तानची आहे. तसेच नरगीस देखील अभिनेत्रीपेक्षा काही कमी दिसत नाही.
https://www.instagram.com/p/B6vstjnDed6/?igshid=1lbg4v4t77x8y
२) हसन अली : पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हसन अली याने, २० ऑगस्ट २०१९ रोजी भारतीय फ्लाइट अटेंडंट शामिया आरजूसोबत विवाह केला होता. ती अनेकदा वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसून आली आहे.
https://www.instagram.com/p/CEGl1pGpeNX/?igshid=1ltncp47n24db
३) शोएब मलिक : पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक याने २०१० मध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत विवाह केला होता. सानिया आपल्या खेळामुळे जगप्रसिद्ध आहे. तसेच ती एक स्टाइल आयकॉन देखील आहे.
https://www.instagram.com/p/CHposH9nSAR/?igshid=1c00eqpd0jm2
४) वहाब रियाज : पाकिस्तान संघाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज वहाब रियाज याने २०१३ मध्ये पाकिस्तानमधील प्रसिद्ध बिजनेसमनची कन्या जैनब चौधरीसोबत विवाह केला होता. जैनब देखील दिसायला खूप सुंदर आहे. ती अनेक अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत टक्कर देऊ शकते.
https://www.instagram.com/p/B7KwDvwh1yQ/?igshid=p3sv8lhe6zk1
५) इमाद वासिम : डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज इमाद वासिम याने पाकिस्तानी मूळच्या ब्रिटीश मुलीला आपल्या प्रेमात पाडले होते. तसेच इमाद वासिम आणि सानिया अश्फाक या दोघांनी २०१९ मध्ये विवाह केला होता.
https://www.instagram.com/p/CEP9-h4FiWe/?igshid=1kk0lyc1a61wd
६) सरफराज अहमद : पाकिस्तानी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद याला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते. परंतु त्याची पत्नी एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल इतकी सुंदर आहे. हे दोघेही २००५ विवाह बंधनात अडकले होते. तसेच ती अनेकदा स्टेडियममध्ये आपल्या पतीला सपोर्ट करताना दिसून आली आहे. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
७) मोहम्मद हाफिज : पाकिस्तान संघाचा वरिष्ठ खेळाडू मोहम्मद हाफिज याने मैदानात अनेकदा आपल्या अष्टपैलू कामगिरीने पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिला आहे. परंतु खऱ्या आयुष्यात त्याची पत्नी नाजीयाने त्याला क्लीन बोल्ड केले आहे. या दोघींनी ही २००७ मध्ये प्रेम विवाह केला होता.
https://www.instagram.com/p/CAFecOgFaoW/?igshid=ou6rl0ab53u3
८) शाहिद आफ्रिदी : पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्याने आपल्या मामाची मुलगी नादिया सोबत विवाह केला. या दोघांचा जेव्हा विवाह झाला होता. तेव्हा हे खूप चर्चेत आले होते. नात्यात असल्याने हे दोघेही एकमेकांना चांगलेच ओळखतात.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटविश्वात हळहळ! मैदानावर हृदयविकाराचा झटका येऊन युवा क्रिकेटपटूचे निधन