भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शानदार 112 धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 131 धावांची आघाडी मिळवली आहे. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने देखील जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न सुरू केला होता, मात्र फिरकीपटू आर आश्विनने ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू मार्नस लाब्यूशानेला आपल्या फिरकीत फसवत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला.
अश्विन ऑस्ट्रेलियाच्या डावातील 18 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला होता, तेव्हा लाब्यूशाने 28 धावा करून पूर्णतः स्थिर झाला होता. तो आता भारतीय संघाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारणार असे चित्र दिसत होते, मात्र याच दरम्यान अश्विनने एक सुंदर चेंडू टाकून त्याला बाद केले.
अश्विनने टाकलेल्या चेंडूला लाब्यूशाने बॅफूटवर जाऊन खेळला असता, चेंडू त्याच्या बॅटचा हलकासा किनारा घेत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेकडे गेला. अजिंक्यने कुठलीही चूक न करता चेंडू पकडला व लाब्यूशानेला तंबूत परतावे लागले. त्याच्या विकेटने भारताला सामन्यात पुन्हा एकदा दबदबा निर्माण करण्याची संधी मिळाली आहे.
That's a beauty from Ashwin!
It draws Labuschagne's edge and Rahane takes the simplest of catches #AUSvIND pic.twitter.com/bOZ2UDMWV2
— 7Cricket (@7Cricket) December 28, 2020
BIG wicket for India! Ashwin finds Marnus' edge and he's caught at slip for 28
2-42
📺Watch Day 3 #AUSvIND Test on Fox Cricket or Kayo: https://t.co/V275n130EX
📝Live blog: https://t.co/IvPwkpYEjb
📱Match Centre: https://t.co/hSscBuONMn pic.twitter.com/vLqw7PdfYW
— Fox Cricket (@FoxCricket) December 28, 2020
दरम्यान ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाखेर 66 षटकात 6 गडी गमावत 133 धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीवीर मॅथ्यू वेडने त्यांच्या तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत सर्वाधिक 40 धावा केल्या. तर स्टार बॅट्समन स्टीव स्मिथ 8 धावांवर बाद झाला. याव्यतिरिक्त ट्रेविस हेड टीम पेनही खास काही करु शकते नाहीत. हेड 17 आणि पेन 1 धावेवर बाद झाला.
भारताकडून तिसऱ्या दिवसाखेर रविंद्र जडेजाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर उमेश यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि आर आश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टॅग –
मराठीत माहिती, माहिती, रविचंद्रन आश्विन,मार्णस लाबुशाने, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ,
Information in Marathi, Marathi, R Ashwin, Ajinkya Rahane ,Steve Smith, Marnus Labuschagne