---Advertisement---

पुण्यातील पावसामुळे केदार जाधव सोशल मीडियावर ट्रोल

---Advertisement---

महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरांनाही झोडपून काढले आहे. मागील आठवडाभर सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे सोमवारी राज्यातील अनेक शाळा महाविद्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.

पण गमतीचा भाग म्हणजे या पावसामुळे पुण्याचा क्रिकेटपटू केदार जाधव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.

झाले असे की जून-जूलै महिन्यात इंग्लंड आणि वेल्समध्ये पार पडलेल्या 2019 विश्वचषक स्पर्धेत अनेक संघांना पावसाच्या व्यत्ययाचा फटका बसला होता. या विश्वचषकात अनेक सामन्यांमध्ये पावसाने अडथळा आणला होता.

या विश्वचषकातील तब्बल 4 सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते. यामध्ये भारत आणि न्यूझीलंड संघातील साखळी फेरीतील सामन्याचाही समावेश आहे.

त्यामुळे विश्वचषकावेळी केदारने पावसाला ‘महाराष्ट्रात तूझी जास्त गरज आहे, त्यामुळे तू तिकडे जा’ अशी विनवणी केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता.

पण आता महाराष्ट्रात गेला आठवडाभर सातत्याने पाऊस सुरु असल्याने केदार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.

विश्वचषकावेळी केदारने पावसाला महाराष्ट्रात जा अशी केलेली विनवणी – 

https://twitter.com/Boomrah_/status/1139156247096242176?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1139156247096242176&ref_url=https%3A%2F%2Findianexpress.com%2Farticle%2Ftrending%2Fviral-videos-trending%2Fkedar-jadhav-wins-hearts-online-urging-rains-to-divert-from-england-781810%2F

मागील आठवड्यापासून महाराष्ट्रात होत असलेल्या पावसामुळे केदार होतोय अशाप्रकारे ट्रोल –

https://twitter.com/chetandoctor007/status/1158035390831329281

https://twitter.com/Samadhan_786/status/1158022108233945088

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

वाढदिवस विशेष: माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद बद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?

शानदार अर्धशतकी खेळी करत रोहित शर्माचा टी२०मध्ये विश्वविक्रम; विराटला टाकले मागे

‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलला मागे टाकत ‘हिटमॅन’ रोहित शर्माने केला मोठा विश्वविक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment