आठव्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) रविवारी (30 ऑक्टोबर) पुन्हा एकदा थरारक सामना पाहायला मिळाला. हा सामना बांगलादेश-झिम्बाब्वे (BANvZIM) यांच्यात खेळला गेला. ब्रिसबेनच्या गाबावर खेळला गेलेला हा सामना बांगलादेशने अवघ्या तीन धावांनी जिंकला. या सामन्याच्या शेवटच्या षटकात झिम्बाब्वेला जिंकण्याची संधी होती, मात्र त्याआधीच्या षटकात शाकिब अल हसन याने क्षेत्ररक्षणाचा जो उत्तम नमुना सादर केला त्याने सामन्याचे संपूर्ण चित्रच पालटले.
झाले असे की, बांगलादेशकडून 19वे षटक कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने टाकले. त्याने पहिल्या तीन चेंडूवर 7 धावा दिल्या. यामुळे झिम्बाब्वेला पुढील 9 चेंडूंमध्ये 19 धावा करायच्या होत्या. हे झिम्बाब्वेसाठी सोपे वाटत होते, कारण क्रीझवर सीन विलियम्स (Sean Williams) आणि रेयान (Ryan Burl) बर्ल होते. ज्यांनी 43 चेंडूत 63 धावांची उत्तम भागीदारी केली होती. विलियम्स 64 आणि बर्ल 27 धावा करत खेळपट्टीवर उभे होते, मात्र 19व्या षटकाच्या चौथ्या चेंडूने सामन्याची बाजी पलटली.
शाकिबच्या त्या चेंडूवर विलियम्सने शॉट मारला, मात्र तो चेंडू शाकिबच्या जवळ राहिला तेव्हाच विलियम्स धाव घेण्यासाठी पळाला आणि शाकिबने लगेचच चेंडूवर झडप टाकत नॉन स्ट्रायकरच्या स्टम्पला थ्रो केला. तेव्हा विलियम्स पुष्कळ मागे होता, याच थ्रोमुळे बांगलादेश सामन्यात परतला. बर्ल नाबाद राहिला मात्र दुसऱ्या बाजूने विकेट पडत राहिल्याने झिम्बाब्वेने हा सामना 3 धावांनी गमावला. शाकिबची कामगिरी पाहिली तर त्याने अनेक सामन्यात बांगलादेशसाठी महत्वाची भुमिका पार पाडली.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर सौम्य सरकार शून्यावर बाद झाला. काही अंतराने बांगलादेशच्या विकेट्स पडतच राहिल्या. त्यांचा सलामीवीर नजमुल शांतो हा मात्र टिकून खेळला. त्याने 55 चेंडूत 71 धावा केल्या. यामुळे बांगलादेशने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 150 धावसंख्या उभारली. झिम्बाब्वेकडून रिचर्ड नागरावा आणि ब्लेसिंग मुजरबानी यांनी उत्तम गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
https://twitter.com/taimoorze/status/1586608507998142467?s=20&t=xIqbBCd4pgd3eZvd2fEMTw
लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचे पहिले तीन फलंदाज एकेरी धावा करतच बाद झाले. चौथ्या क्रमांकावर सीन विलियम्स याने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. रेगिस चकाब्वा, विलियम्स आणि रेयान बर्ल वगळता कोणताही झिम्बाब्वेचा फलंदाज 10 धावांच्या पुढे गेला नाही. त्यातच आज सिकंदर रझा याचा दिवस नव्हता, कारण त्याने 4 षटकात 35 धावा देत एक विकेट आणि फलंदाजी करताना शून्यावर बाद झाला. सामन्यातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडूला पंचांनी नो बॉल दिला, मात्र ब्लेसिंग मुजरबानी ना चांगला शॉट खेळू शकला ना एकेरी धाव घेऊ शकला यामुळे झिम्बाब्वे 20 षटकात 8 विकेट्स गमावत 147 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. सामनावीर तस्किन अहमद ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतच सरस! वर्ल्डकपमध्ये चकित करणारी कामगिरी, पाहा भन्नाट आकडेवारी
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात बांगलादेशचा झिम्बाब्वेवर रोमांचक विजय, केली भारताची बरोबरी