– अनिल भोईर
क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड व अनिषा ग्लोबल इंग्लिश स्कुल, आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष मुले/मुली कबड्डी स्पर्धा २०१८-१९ चे आयोजन बीड येथे करण्यात आले आहे. यास्पर्धेचे उद्घाटन १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री मा. ना. पंकजा गोपीनाथ मुंढे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला अनेक राजकीय व क्रीडाक्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू नितीन मदने, सुवर्णा बारटक्के, सोनाली शिंगटे तसेच प्रो कबड्डी खेळाडू सुलतान डांगे, दादा आव्हाड उपस्थित राहणार आहेत.
राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष मुले/मुली कबड्डी स्पर्धेविषयी सर्व काही:
स्पर्धेत सहभागी संघ- यास्पर्धेसाठी राज्यातून मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर या आठ विभागातून १९ वर्ष मुलाचा/ मुलीचा प्रत्येकी १-१ संघ सहभाग घेणार असून आठ विभागातून १६ संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत.
स्पर्धाचा कालावधी- या कबड्डी स्पर्धेचे आयोजन ०१ डिसेंबर ते ०३ डिसेंबर दरम्यान तीन दिवस करण्यात आले आहे. सामने सायंकाळ सत्रात खेळवण्यात येतील.
स्पर्धाचे ठिकाण- अनिषा ग्लोबल इंग्लिश स्कुल, जामगाव रोड, ता. आष्टी, जि. बीड येथे आयोजन केले आहे.
स्पर्धा आयोजक- या स्पर्धेचे आयोजक हे अनिषा ग्लोबल इंग्लिश स्कुल, बीड हे आहेत.
निवड चाचणी- शेवटच्या दिवशी ३ डिसेंबर रोजी निवड चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक विभागातुन ५ मुले व ५ मुली एकूण ८० खेळाडू निवड चाचणीत सहभागी होणार आहेत. यास्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा १९ वर्ष मुलाचा व मुलीचा संघ निवडला जाणार असून हा संघ राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल
मुले विभाग आजचे सामने
१) मुंबई विभाग विरुद्ध लातूर विभाग
२) कोल्हापूर विरुद्ध अमरावती
३) पुणे विरुद्ध नागपूर
४) नाशिक विरुद्ध औरंगाबाद
मुली विभाग आजचे सामने
१) कोल्हापूर विरुद्ध लातूर
२) अमरावती विरुद्ध पुणे
३) नागपूर विरुद्ध औरंगाबाद
४) नाशिक विरुद्ध मुंबई
महत्त्वाच्या बातम्या-
–हॉकी विश्वचषक २०१८: ‘स्पीडी टायगर’ मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान
–आॅस्ट्रेलियात भारतीय सलामीवीरांची धमाकेदार कामगिरी
–ISL 2018: जमशेदपूर-नॉर्थइस्ट लढतीत प्ले-ऑफ प्रवेशासाठी चुरस