विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तर दुसरा सामना बर्मिंघमच्या एजबस्टनमध्ये खेळला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. अशातच दर्शकांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रोरी बर्न्स आणि डॉमिनिक सिबले यांनी इंग्लंड संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. हे पाहून क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये क्रिकेट चाहत्यांनी प्लास्टिक कपचा साप बनवल्याचे दिसून येत आहे. हा साप लांबच लांब पसरल्याचे दिसून येत आहे.
हा व्हिडिओ स्काय स्पोर्ट्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच एजबस्टनमध्ये सामना पाहण्यासाठी येणारे बहुतांश क्रिकेट चाहते असाच आनंद साजरा करत असतात.
Longest beer snake ever? 🍺
Fair to say the Edgbaston crowd are enjoying their return to Test cricket 👏
📺 Watch #ENGvNZL on Sky Sports Cricket now pic.twitter.com/xRYDCkk8AB
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 10, 2021
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ३०३ धावा केल्या आहेत. यामध्ये रोरी बर्न्स याने ८१ धावांची खेळी केली. तो शतक करण्यापासून काही धावांनी हुकला आहे. तसेच डॉमिनिक सिबले याने ३५ धावांचे योगदान दिले. मार्क वूड हा ४१ धावा करत माघारी परतला आहे. तर न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना, ट्रेंट बोल्ट याने ८५ धावा देत ४ गडी बाद केले आहेत. तसेच मॅट हेनरीने ७८ धावा देत ३ गडी बाद केले आहेत. यासोबतच एजाज पटेलला २ गडी बाद करण्यात यश आले आहे.
हा सामना झाल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. केन विलियमसन संघाबाहेर झाल्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभारले आहेत. त्याच्या अनुपस्थित भारतीय संघाचे पारडे या सामन्यात जड असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘घरी नको जायला, खूप मार पडेल’; युवीने सांगितला २००७ विश्वचषकानंतरचा तो किस्सा
धोनीसोबतच्या मैत्रीमुळे भारतीय संघात देण्यात येत होती जागा? सुरेश रैनाने दिले ‘हे’ उत्तर