आशिया चषक (Asia Cup)स्पर्धेच्या 15व्या हंगामात पाकिस्तानने शुक्रवारी (2 सप्टेंबर) हाँगकाँगचा पराभव केला. यामुळे पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबई येथे खेळला जाणार आहे. सुपर फोरचा हा सामना रविवारी (4 सप्टेंबर) सांयकाळी 7.30ला खेळला जाणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटूने विराट कोहलीविषयी मोठे विधान केले आहे. यामध्ये त्यांनी विराटला 100 शतक करायचे असेल तर क्रिकेटच्या कोणत्यातरी एका प्रकारामधून निवृत्ती घ्यावी लागेल, असे मत मांडले आहे.
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा मागील काही महिन्यांंपासून आऊट ऑफ फॉर्म होता. त्याने पाकिस्तान विरुद्ध महत्वाची खेळी करत तो फॉर्ममध्ये परतला हे सिद्ध केले. तसेच त्याने हाँगकाँग विरुद्ध अर्धशतकही करत चाहत्यांचे मन जिंकले आहे. यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. विराटचा फॉर्म परतल्याने भारतीय चाहते खूष असताना पाकिस्तानने त्यावर विरजण टाकले आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने विराटबाबत म्हटले, “जर विराटला 100 शतक करायचे असतील तर कोणत्यातरी एका प्रकारातून निवृत्ती घ्यावी लागले. तो चांगल्या चेंडूवर खरचं वाईट खेळत आहे. त्याची आशिया चषकाच्या मागील दोन डावांमधील कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. त्याने 59 धावा केल्या, याबद्दल त्याचे अभिनंदन.”
“तुम्ही नेहमीसाठी महान खेळाडू बनू शकता. तुम्ही एक उत्तम फलंदाज आहात हा विश्वास स्वत:ला देणे आवश्यक आहे. तो मोठी खेळी करेल तर ते 30 शतक सगळ्यात कठीण असतील. जर त्याने कसोटी क्रिकेट खेळले तर त्याला खेळपट्टीवर अधिक वेळ मिळेल,” असेही अख्तरने पुढे म्हटले आहे.
आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात विराटने तिसऱ्या चेंडूवर फलंदाजीला येत 35 धावा केल्या. ती खेळी भारतासाठी 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना महत्वाची ठरली. कारण त्यावेळी भारताचा उपकर्णधार केएल राहुल गोल्डन डकवर बाद झाला होता. तसेच विराटने हाँगकाँग विरुद्ध नाबाद 59 धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
साधेभोळे राहुल द्रविड S**y शब्द उच्चारायला लाजले! पत्रकार परिषदेतील व्हिडिओ तुफान व्हायरल
‘भारत डरपोक, शारजाहमध्ये खेळायला घाबरते’; महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानमधून इंडियावर आरोप
Asia Cup: पाकिस्तानविरुद्ध भारताला घ्यावा लागणार मोठा निर्णय, दिनेश कार्तिकला बसावे लागेल बाहेर!