इंडियन प्रीमिअर लीग 2023चा महाकुंभमेळा येत्या 31 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू आपला दम दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. यामध्ये स्टीव्ह स्मिथ याचाही समावेश आहे. मात्र, यावेळी स्मिथ मैदानातून नाही, तर कॉमेंट्री बॉक्समधून चौकार-षटकार लावताना दिसणार आहे. आयपीएल 2022च्या लिलावात खरेदीदार न मिळाल्यामुळे स्मिथने आयपीएल 2023मध्ये नाव दिले नव्हते. आता स्मिथने आयपीएलपूर्वी सांगितले की, तो या स्पर्धेत वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
स्टीव्ह स्मिथची भविष्यवाणी
स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेपूर्वी प्ले-ऑफबाबत भविष्यवाणी (Steve Smith Prediction) केली आहे. त्याने सांगितले आहे की, यावर्षी प्ले-ऑफमध्ये पोहोचणाऱ्या चार संघांची नावे सांगितली आहेत. या यादीत स्मिथने गतवर्षीच्या उपविजेत्या राजस्थान रॉयल्सला स्थान दिले नाहीये. याव्यतिरिक्त त्याने पाच वेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघांनाही प्ले-ऑफसाठी निवडले नाहीये.
कोणत्या संघांची केली निवड?
स्मिथने प्ले-ऑफमध्ये पोहोचणारे जे चार संघ निवडले आहेत, त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांची निवड केली आहे. विशेष म्हणजे, या चारपैकी गुजरात आणि लखनऊ या संघांनाच प्ले-ऑफचे तिकीट मिळवण्यात यश आले होते. तसेच, चेन्नई नवव्या, तर हैदराबाद संघ आठव्या स्थानी विराजमान होता.
Steve Smith picks CSK, GT, LSG & SRH as play-off teams in IPL 2023.
— Johns. (@CricCrazyJohns) March 29, 2023
या संघांकडून खेळलाय स्मिथ
खरं तर, स्मिथने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघाचेही नेतृत्व केले आहे. याव्यतिरिक्त तो दिल्ली कॅपिटल्स, कोची टस्कर्स केरला, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांकडूनही खेळला आहे.
स्मिथची आयपीएल कारकीर्द
स्टीव्ह स्मिथ याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 103 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 34.51च्या सरासरीने 2485 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 11 अर्धशतकांचा पाऊसही पाडला आहे. (before ipl 2023 steve smith predicts these 4 teams will reach the playoffs rcb and mumbai indians are out know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPLपूर्वी बांदलादेशमध्ये वादळ, ‘या’ धुरंधराने झळकावली टी20तील वेगवान फिफ्टी, केकेआरचंही नशीब फळफळलं
अखेर पंतची रिप्लेसमेंट मिळालीच, ‘या’ पठ्ठ्याची दिल्लीच्या ताफ्यात एन्ट्री