दक्षिण अफ्रिकेकडून कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत पराभव मिळाल्यानंतर भारतीय संघ (team india) फेब्रुवारी माहिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघाला तीन सामन्यांची टी-२० आणि एकदिवसीय मालिका (ind vs wi odi & t20 series) खेळायची आहे. तत्पूर्वी संघातील खेळाडूंना स्वतःच्या कुटुंबासोबत काही वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे.
भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्माही (rohit sharma) सध्या त्याच्या कुटुंबासोबत आहे. रोहितने वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेपूर्वी पत्नी रितिका सजदेह (ritika sajdeh) सोबत एक खास फोटो शेअर केला आहे, जो चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
व्हिडिओ पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण |
रोहितने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून रितिका सजदेहसोबतचा हा खास फोटो शेअर केला आहे. फोटो रोहितच्या घरचा असण्याची शक्यता आहे, कारण रोहितने पोस्टच्या कॅप्शनमध्ये “माझे घर” असा उल्लेख केला आहे. फोटोत दोघे पती-पत्नी आनंदात दिसत आहेत आणि सुट्टीचा आनंद घेत आहेत. रोहित आणि रितिकाच्या या फोटोला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात लाईक्सही मिळत आहेत.
https://www.instagram.com/p/CZPCa_qBXcE/?utm_source=ig_web_copy_link