भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. तो एक महान खेळाडू असण्याबरोबरच खूप चांगला व्यक्तीही आहे. त्याच्या चाहत्यांना बऱ्याचदा याचा प्रत्यय आला आहे. हाच विराट सध्या श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना (Virat Kohli’s 100th Test) खेळतो आहे. आपल्या शानदार कारकिर्दीतील या विलक्षण विक्रमाची भर घालण्यापूर्वी विराटने एक कौतुकास्पद काम (Virat Kohli Did Noble Work) केले आहे.
श्रीलंकेविरुद्ध १०० वी कसोटी खेळण्यापूर्वी विराटने विवाल्डिस ऍनिमल हेल्थचे सीईओ कुणाल खन्ना आणि आवाज: व्हॉईस ऑफ स्ट्रे ऍनिमल्सच्या टीममधील सदस्यांसोबत बातचीत केली. या चर्चेदरम्यान विराटने सीईओ खन्ना यांच्यासोबत भविष्यातील योजना आणि विस्तारांवर सविस्तर चर्चा केली. याबरोबरच त्याने भटक्या प्राण्यांची मदत करण्यासाठी रुग्णवाहिका (Virat Kohli Helped Animals) सेवा सुरू केली आहे. या रुग्णवाहिका सेवाचे त्याच्या हस्ते उद्घाटनदेखील करण्यात आले आहे.
यापूर्वी विवाल्डिसच्या समर्थनाने विराट कोहली फाउंडेशनने गतवर्षी भटक्या जनावरांसाठी एक पुनर्वसन आणि ट्रॉमा सेंटर व रुग्णवाहिका सेवा सुरू केली होती.
हेही वाचा- रिकी पाँटिंगनंतर बरेच खेळाडू १०० कसोटी खेळले, पण ‘तो’ पराक्रम एकट्या विराट कोहलीलाच जमला
दरम्यान विराटने श्रीलंकेविरुद्ध कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळताना बरेचसे विक्रम केले आहेत. त्यातील काही विक्रमांची यादी खालीलप्रमाणे-
तो भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा १२ वा खेळाडू ठरला आहे.
भारतीय संघासाठी १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर- २०० कसोटी सामने
राहुल द्रविड- १६३ कसोटी सामने
वीवीएस लक्ष्मण- १३४ कसोटी सामने
अनिल कुंबले- १३२ कसोटी सामने
कपिल देव- १३१ कसोटी सामने
सुनील गावस्कर- १२५ कसोटी सामने
दिलीप वेंगसरकर- ११६ कसोटी सामने
सौरव गांगुली- ११३ कसोटी सामने
इशांत शर्मा- १०५ कसोटी सामने
हरभजन सिंह- १०३ कसोटी सामने
विरेंद्र सहवाग- १०३ कसोटी सामने
विराट कोहली – १०० कसोटी सामने
या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ४५ धावा करत त्याने कसोटीतील ८००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो भारताकडून ८००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा सहावा फलंदाज ठरला आहे.
भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१५९२१ धावा – सचिन तेंडुलकर (२०० सामने)
१३२६५ धावा – राहुल द्रविड (१६३ सामने)
१०१२२ धावा – सुनील गावसकर (१२५ सामने)
८७८१ धावा – व्हीव्हीएस लक्ष्मण (१३४ सामने)
८५०३ धावा – विरेंद्र सेहवाग (१०३ सामने)
८००७ धावा – विराट कोहली (१०० सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
गांगुलींची पोल-खोल! बीसीसीआय संविधानाची अध्यक्षच करतात पायमल्ली; वाचा सविस्तर
शंभराव्या कसोटीत विराट कोहलीची ४५ धावांवर दांडी गुल, कर्णधार रोहितने धरलं डोक; रिऍक्शन व्हायरल