भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ सराव करत आहेत. दोन्ही संघ पहिल्या टी20 सामन्यासाठी (6 ऑक्टोबर) रोजी आमने-सामने येणार आहेत. पण बांगलादेशात संघात महत्त्वाचा खेळाडू नसल्यामुळे भारताचे या सामन्यात वर्चस्व दिसत आहेत. तत्पूर्वी बांगलादेश संघाचा स्टार फलंदाज तौहीद हृदयने सामन्यापूर्वी एक मोठी माहिती दिली आहे.
तौहीद हृदय (Towhid Hridoy) सामन्यापूर्वी म्हणाला, “टी20 हा धावांचा खेळ आहे आणि प्रत्येक संघाला धावा करायच्या असतात. मात्र येथे बऱ्याच दिवसांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. हे नवीन ठिकाण आहे आणि इथली खेळपट्टी कशी असेल हे आम्हाला माहीत नाही. इथे एकही आयपीएल सामना झाला नाही. पण सराव खेळपट्टी पाहता खेळपट्टी संथ आहे असे मला वाटते. या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या दिसत नाही.”
तौहीद पुढे म्हणाला, “सामन्यात नेहमीच दडपण असते, पण त्याचा विचार केला तर आपण चांगली कामगिरी करू शकणार नाही. आम्ही नेहमी प्रक्रियेचे पालन करतो. साकिब भाई यापुढे संघाचा भाग नाही आणि आम्हाला त्याची आठवण येईल. पण सगळ्यांनाच निवृत्त व्हायचे आहे. भारताला पराभूत करण्यात आम्ही यशस्वी होऊ अशी आशा आहे.”
3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी दोन्ही संघ-
भारत- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव
बांगलादेश- नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनजीद हसन तमीम, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद हृदोय, महमूद उल्लाह, लिटन कुमार दास, जाकेर अली अनिक, मेहंदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शोरिम अहमद, मुस्तफिजुर रहमान. हसन साकिब, रकीबुल हसन
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; टी20 मालिकेपूर्वी भारताला मोठा झटका! ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर
आश्चर्यकारक! वनडेमध्ये ‘या’ एकाच सामन्यात झाले होते सर्वाधिक RUN-OUT
भारत-न्यूझीलंड सामन्यात अंपायरच्या निर्णयामुळे राडा!