पुणे। पुणे महानगर पालिका यांच्या तर्फे व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत 14वर्षाखालील मुलांच्या गटात ईशान बेगमवारने तर मुलींच्या गटात रुमा गायकैवारी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित ईशान बेगमवार याने तिसऱ्या मानांकित अर्णव कोकणेचा टायब्रेकमध्ये 3-4(2), 4-2, 4-0 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. याआधीच्या उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित अर्णव कोकणेने अव्वल मानांकित आर्यन हूडचा 6-2 असा तर, दुसऱ्या मानांकित ईशान बेगमवारने आर्यन देवकरचा 6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात पाचव्या मानांकित रुमा गायकैवारी हिने सोनल पाटीलचा 3-4(1), 4-1, 4-3(2)असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. उपांत्य फेरीत पाचव्या मानांकित रुमा गायकैवारीने मयुखी सेनगुप्ताचा 6-0 असा तर, सोनल पाटीलने श्रावणी खवळेचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अश्विन गिरमे, नवनाथ शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 14 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
अर्णव कोकणे(3) वि.वि.आर्यन हूड(1) 6-2;
ईशान बेगमवार(2) वि.वि.आर्यन देवकर 6-1;
अंतिम फेरी: ईशान बेगमवार(2) वि.वि.अर्णव कोकणे(3) 3-4(2), 4-2, 4-0;
14 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
रुमा गायकैवारी(5)वि.वि.मयुखी सेनगुप्ता 6-0;
सोनल पाटील वि.वि.श्रावणी खवळे 6-4;
अंतिम फेरी: रुमा गायकैवारी(5)वि.वि.सोनल पाटील 3-4(1), 4-1, 4-3(2).