---Advertisement---

गुजरात जायंट्सवर भारी पडले बंगळुरू बुल्स, मोठा विजय मिळवत दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश

On: सोमवार, फेब्रुवारी 21, 2022 9:54 PM
Bengluru vs Gujrat
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून सध्या बाद फेरी सामने सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या २१ तारखेला प्रो कबड्डीचा दुसरा एलिमिनेटर सामना गुजरात जायंट्स विरुद्ध बंगळुरू बुल्स संघात झाला. बंगळुरू बुल्सने ४९-२९ च्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकत उपांत्य फेरीत उडी मारली आहे. बंगळुरू बुल्स संघ उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ बनला आहे.

तत्पूर्वी याच दिवशी पहिला एलिमिनेटर सामना झाला. या सामन्यात यूपी योद्धा आणि पुणेरी पलटण संघ आमने सामने होते. यूपी योद्धांनी ४२-३१ च्या फरकाने हा सामना जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यूपी योद्धा प्रो कबड्डीचा सेमी फायनल गाठणारा तिसरा संघ बनला आहे. 

या दोन संघांपूर्वी पटणा पायरेट्स आणि दबंग दिल्ली संघांनी सेमी फायनलमधील आपले स्थान निश्चित केले होते. यूपी योद्धांनी पहिला एलिमिनेटर सामना जिंकला असल्याने उपांत्य फेरीत त्यांचा सामना पटणा पायरेट्स संघाशी होईल. तर गुजरात जायंट्स संघाने दुसरा एलिमिनेटर सामना जिंकला असून उपांत्य फेरीत त्यांचा प्रतिस्पर्धी दबंग दिल्ली संघ असेल. 

महत्त्वाच्या बातम्या-

वेस्ट इंडिज फत्ते, आता पुढचे लक्ष्य श्रीलंका; पहिल्या टी२० सामन्यासाठी ‘रोहित आणि संघ’ लखनऊमध्ये दाखल

यूपी योद्धांपुढे पुणेरी पलटणचे नामोहरम, ११ गुणांनी सामना जिंकत उपांत्य फेरीत दिली धडक

कर्णधार धोनीची वाढली डोकेदुखी! सीएसकेने १४ कोटी मोजलेला खेळाडू हंगामातून होऊ शकतो बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---