अजिंक्य रहाणेला इंग्लंड दौऱ्यातील वनडे तसेच टी२० मालिकेतून वगळण्यात आले आहे. यावर रहाणेला विचारले असता त्याने आपल्याला कसोटी मालिकेत चांगली तयारी करता येईल असे उत्तर दिले आहे.
८ मे रोजी इंग्लंड दौऱ्याची घोषणा झाली. त्यात आश्चर्यकारकरित्या अजिंक्य रहाणेचे वनडे तसेच टी२० संघातून नाव वगळण्यात आले होते.
यावर काल त्याला एका पुरस्कार सोहळ्यानंतर पत्रकारांनी विचारले असता त्याने याकडे सकारात्मक दृष्टीने पहात असल्याचे उत्तर दिले.
“तुम्ही या मालिकेसाठी स्वत:ला तयार करत आहात. यासाठी तुम्हाला वेळ मिळत आहे ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला कळतं की तुमच नाव वनडे टीममध्ये नाही परंतु तुम्हाला कसोटी मालिकेसाठी जायच आहे तेव्हा तुमच्याकडे बराच वेळ असतो. मला अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी चांगला वेळ मिळणार आहे तसेच त्यानंतरही मला वेळ आहे.” असे रहाणे यावेळी म्हणाला.
“मला वनडेतुन वगळण्यात आल्यामुळे मी अजिबात निराश झालो नाही. मी सध्या कसोटी सामन्यावर लक्ष देत आहे आणि मला खात्री आहे की मी वनडेत पुनरागम नक्की करेल आणि २०१९साठी मी नक्कीच सकारात्मक आहे.” असेही तो पुढे म्हणाला.
रहाणे अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. ही एकमेव सामन्याची कसोटी मालिका बेंगलोरला १४ ते १८ जून दरम्यान होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–अशी आहे अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडिया
–डेविड वॉर्नर-बॅनक्रॉफ्ट पुनरागमनाठी सज्ज
-तो स्क्रिनशाॅट पाहिल्यावर नक्की काय करावे सुचत नव्हते- राशिद खान
–ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज
–चेतेश्वर पुजाराने इंग्लंड गाजवले, वनडेत पुन्हा एक तुफानी फटकेबाजी
–त्याची आयपीएलमधील एक विकेट गेली ३० लाख रुपयांना!