सॅम करन आणि टॉम करन हे इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात. त्यांचे वडील झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. आता सॅम आणि टॉमचा भाऊ देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणार आहे. परंतु तो त्याच्या भावांप्रमाणे इंग्लंडसाठी नाही तर वडिलांप्रमाणे झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.
वास्तविक, अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी बेन करन याची प्रथमच झिम्बाब्वेच्या संघात निवड झाली आहे. या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होईल. त्याच्याशिवाय संघात युवा डावखुरा वेगवान गोलंदाज न्यूमन न्यामाहुरी याचीही प्रथमच निवड झाली. या 18 वर्षीय खेळाडूनं या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत आपली छाप सोडली होती. त्या स्पर्धेत तो झिम्बाब्वेकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता.
बेन करन हा टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे. तो आवश्यकतेनुसार ऑफ स्पिन गोलंदाजीही करू शकतो. आतापर्यंत त्यानं आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 45 सामने खेळून 2,429 धावा केल्या आहेत. त्यानं लिस्ट-ए कारकिर्दीत आतापर्यंत 36 सामने खेळल्यानंतर 999 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर प्रथम श्रेणी करिअरमध्ये 4 विकेटही आहेत.
अफगाणिस्तानविरुद्ध झिम्बाब्वेचा टी20 संघ – सिकंदर रजा (कर्णधार), फराज अकरम, ब्रायन बैनेट, रयान बर्ल, ट्रॅवर ग्वांडू, ताकुदजज्वानाशे काइतानो, वेस्ली मधेवेरे, टिनोटेंडा मापोसा, तदिवानाशे मारुमनी, वेलिंगटन मसाकादजा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुजरबानी, डियोन मायर्स, रिचर्ड नगारवा, न्यूमॅन न्यामहुरी
अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वेचा एकदिवसीय संघ – क्रेग एर्विन (कर्णधार), ब्रायन बैनेट, बेन करन, जॉयलॉर्ड गम्बी, ट्रेवर ग्वांडू, टिनोटेंडा मापोसा, तादिवानाशे मारुमानी, वेलिंगटन मसाकादजा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुजरबानी, डियोन मायर्स, रिचर्ड नगारवा, न्यूमॅन न्यामहुरी, विक्टर न्याउची, सिकंदर रजा, शॉन एर्विन
हेही वाचा –
मोहम्मद सिराजला मोठा झटका, आयसीसीने केली कारवाई; ट्रॅव्हिस हेडची सुटका!
जय शाहंचा उत्तराधिकारी! या व्यक्तीला मिळाली बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी
दक्षिण आफ्रिका WTC फायनलपासून केवळ एक पाऊल दूर, भारताच्या अडचणी वाढल्या





