कोणत्याही क्रिकेट सामन्यात गोलंदाज विकेट घेतल्यानंतर किंवा फलंदाज मोठ्या धावा अथवा मोठा फटका मारल्यानंतर विशेष पद्धतीने जल्लोष साजरा करताना दिसतात. पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) सुरू आहे. या स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बेन कटिंग (Ben Cutting) याने असभ्य असे सेलिब्रेशन केले आहे. त्या फलंदाजाने असे सेलिब्रेशन करत एकप्रकारे पाकिस्तानचा गोलंदाज सोहेल तनवीर (Sohail Tanvir) याच्यासोबतचा आपला जुना सूड (Ben Cutting Middle Finger Showing Celebration) घेतला आहे.
वर्ष २०१८ मध्ये कॅरेबियन प्रीमियर लीगमधील एका सामन्यादरम्यान सोहेल तनवीरने बेन कटिंगला बाद केल्यानंतर हाताचे मधले बोट दाखवत जल्लोष साजरा केला होता. असे सार्वजनिक रूपात हाताचे मधले बोट दाखवणे अपमानजनक मानले जाते. त्यातही लाखो दर्शकांपुढे असे करणे वादाला तोंड फुटण्यासाठी पुरेसे असते. परंतु सोहेल तनवीरला याने कसलाही फरक पडला नव्हता. मात्र बेन कटिंगने ही गोष्ट डोक्यात ठेवून ४ वर्षांनंतर त्याचा सूड घेतला आहे.
Now wait for ultra revenge#bencutting #SohailTanveer #PSL7 pic.twitter.com/OzyiBu3njP
— Z O H A I B (@itzZohaibAli) February 16, 2022
मंगळवारी (१५ फेब्रुवारी) पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जाल्मी विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स संघात सामना झाला. या सामन्यादरम्यान बेन कटिंगने सोहेल तनवीरपुढे असे सेलिब्रेशन केले आहे. बेन कटिंग फलंदाजी करत असताना सोहेल तनवीर डावातील १९ वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकात बेन कटिंगने सलग ३ षटकार मारले. यानंतर बेन कटिंगने हाताची दोन बोटे दाखवत सेलिब्रेशन केले.
I risk my account to show you the complete story of Sohail Tanvir & Ben Cutting's rivalry, ???????? #PSL7 #PSL2022 #PZvQG pic.twitter.com/4HPxqnvQg1
— Anmol Farya (@AnmolXK) February 15, 2022
त्यांच्यातील वाद इतक्यावरच संपला नाही. पुढे बेन कटिंगने याच षटकात अजून एक षटकार मारला. त्यानंतर हे दोन्ही खेळाडू आपापसांत भिडताना दिसले. अखेर याच बेन कटिंग नसीम शाहच्या षटकात सोहेल तनवीरच्या हाती झेल देऊन बाद झाला. यानंतर सोहेल तनवीरने अशाच प्रकारची अभद्र कृती करत बेन कटिंगला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
दरम्यान बेन कटिंगने या सामन्यात १४ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या. तर सोहेल तनवीरला संपूर्ण सामन्यात एकही विकेट घेण्यात यश आले नाही. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ५० धावा खर्च केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता!! केविन पीटरसनचे पॅन कार्ड हरवले, नरेंद्र मोदींकडे मागितली मदत
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत चहलला इतिहास रचण्याची संधी, बुमराहला टाकले मागे
हा व्हिडिओ पाहून चिन्ना थालाला देखील अश्रू होतील अनावर, पाहा व्हिडिओ






