---Advertisement---

IND vs ENG: गेल्या 10 वर्षांत जे घडले नाही, ते हेडिंग्लेमध्ये ‘या’ फलंदाजाने करून दाखवलं!

On: मंगळवार, जून 24, 2025 6:38 PM
---Advertisement---

Ben Duckett: सध्या भारत आणि इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर रंगला आहे. यादरम्यान इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटने अशी कामगिरी केली आहे, जी गेल्या 10 वर्षांत इंग्लंड संघाच्या कोणत्याही सलामीच्या फलंदाजाला जमली नव्हती. हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या कसोटीत डकेटने उत्कृष्ट फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आहे. यापूर्वी, पहिल्या डावातही डकेटची बॅट चांगलीच तळपली होती आणि त्याने 62 धावांची वेगवान खेळी केली होती. (Ben Duckett Headingley Fifty)

डकेट गेल्या 30 वर्षांत हेडिंग्लेच्या मैदानावर दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा केवळ दुसरा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. (English Batsman Record) डकेटव्यतिरिक्त हा पराक्रम फक्त अ‍ॅलिस्टर कुकनेच केला आहे (जो 2015 मध्ये केला होता). डकेट पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही चांगल्या लयीत दिसला आणि त्याने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बातमी लिहिली जाईपर्यंत डकेट 60 धावांवर खेळत होता. (Ben Duckett Headingley Fifty)

भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दुसऱ्या डावात भारताचा संपूर्ण संघ 364 धावांवर सर्वबाद झाला. केएल राहुलने शानदार फलंदाजी करत 137 धावांची दमदार खेळी केली. तर, रिषभ पंतनेही पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही शतक झळकावले. भारतीय उपकर्णधाराने 140 चेंडूंमध्ये 118 धावांची धडाकेबाज खेळी केली. मात्र, दुसऱ्या डावातही भारतीय संघाने अखेरीस झटपट विकेट्स गमावल्या. 333/4 या धावसंख्येवरून 364 धावांपर्यंत पोहोचताना भारताने 6 विकेट्स गमावल्या आणि संपूर्ण संघ ऑलआउट झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---