---Advertisement---

नंबर १०००! बेन मॅकडरमॉटचे नाव क्रिकेट इतिहासात लिहिले जाणार सुवर्णाक्षरांनी; वाचा ही कामगिरी

On: गुरूवार, मार्च 31, 2022 10:51 PM
ben mcdermott aus
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. (Australia Tour Of Pakistan) कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ वनडे मालिकेत (PAKvAUS ODI Series) विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल. दोन्ही संघांमध्ये गुरुवारी (३१ मार्च) वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला.‌ या सामन्यात शतक झळकावत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बेन मॅकडरमॉट (Ben McDermott) याने इतिहास रचला.

बेन मॅकडरमॉटचे शानदार शतक

उभय संघांमध्ये दुसरा वनडे सामना लाहोर येथील गदाफी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने ८ गडी गमावत ३४८ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार एरॉन फिंच पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर ट्रेविस हेड व बेन मॅकडरमॉट यांनी दुसऱ्या गड्यासाठी १६२ धावा जोडल्या. हेडने ८९ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या बाजूने बेन मॅकडरमॉटने शानदार शतक साजरे केले.  मार्नस लॅब्युशेनने अर्धशतक तर, मार्कस स्टॉयनिसने ४९ धावा करत संघाला ३४८ पर्यंत पोहोचवले.

मॅकडरमॉटची झाली इतिहासात नोंद

या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी शतक झळकावत बेन मॅकडरमॉटने एक ऐतिहासिक कामगिरी केली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक साजरे करणारा १००० वा खेळाडू ठरला. १८७७ मध्ये ज्यावेळी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पहिला क्रिकेट सामना खेळला गेला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्याच चार्ल्स बॅनरमन यांनी पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. बॅनरमन यांच्याकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला चेंडू खेळण्याचा मानही जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५०० वे शतक पाकिस्तानच्या सलीम इलाही यांनी १९९५ मध्ये ठोकले होते. त्यानंतर आता मॅकडरमॉट आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण करणारा १००० वा फलंदाज बनला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरची कसोटी जिंकत, कसोटी मालिका १-० अशी खिशात घातली होती. त्यानंतर, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये एकमेव टी२० सामना खेळला जाईल.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्समध्ये अखेर ‘सूर्योदय’! राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी धडाकेबाज फलंदाज संघात सामील (mahasports.in)

CSK vs LSG | नाणेफेकीचा कौल लखनऊच्या बाजूने, प्रमुख बदलांसह असे आहेत राहुल आणि जडेजाचे संघ (mahasports.in)

द ग्रेट धोनी.! LSG विरुद्धच्या सामन्यात MS DHONI कडून कारकिर्दीतील अविस्मरणीय विक्रमाला गवसणी (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---