---Advertisement---

स्टोक्सच्या पत्नीवर अश्लील टीका करणाऱ्या सॅम्युएल्सला शेन वॉर्न, मायकल वॉ यांनी घेतलं फैलावर, पाहा ट्विट

---Advertisement---

क्रिकेट सामन्यांमध्ये बऱ्याच वेळा प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये खुन्नस पाहायला मिळते.त्याचप्रमाणे इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि वेस्ट इंडिजचा फलंदाज मर्लोन सॅम्युएल यांच्यातही मैदानावर खेळताना बरेच वाद झाले आहेत. मात्र, क्रिकेट मैदानावरील हा वाद थेट सोशल मीडियावर जाऊन पोहोचला होता. सॅम्युएल्सने स्टोक्सच्या पत्नीवर अश्लील टीका केली होती. आता महान फिरकीपटू शेन वॉर्न आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉ यांनी सॅम्युएल्सवर निशाणा साधला आहे.

सॅम्युएल्सने स्टोक्स आणि त्याच्या पत्नीवर केली होती टीका
सॅम्युएल्सने स्टोक्सवर वर्णभेदी टीका केली होती. त्याच्या पत्नीवर केलेली टीकाही अत्यंत घृणास्पद होती.

सॅम्युएल्सचं विधान खेदजनक -वॉ
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉने बेन स्टोक्सच्या पत्नीबद्दल सॅम्युएल्सने केलेलं विधान अत्यंत दुःखद असल्याच म्हटलं आहे. वॉने ट्विटरवर दोन्ही वक्तव्यांचा स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिले आहे की, “एकीकडे आम्हाला क्रिकेटमधून वर्णभेद संपवायचा आहे, तर दुसरीकडे सॅम्युएल्सने केलेलं हे विधान खेदजनक आहे. स्टोक्सच्या वक्तव्याला अधिक महत्व देऊ नये.”

सॅम्युएल्सला मदतीची अवश्यकता -वॉर्न
दुसरीकडे शेन वॉर्ननेही ट्विट केले की मर्लोन सॅम्युएल्सला मदतीची आवश्यकता आहे. त्याने ट्विट केले की, “अत्यंत वाईट परिस्थिती. सॅम्युएल्सला मदतीची गरज आहे, त्याचा कोणीही मित्र नाही आणि त्याच्या संघ सहकाऱ्यांनाही तो आवडत नाही. तू एक साधारण क्रिकेटपटू होता. म्हणून साधारण माणूस होण्याची गरज नाही.”

सॅम्युएल्स आहे बेन स्टोक्सचा शत्रू?  

आयपीएल 2020 मध्ये मैदानात उतरण्यापूर्वी बेन स्टोक्स म्हणाला होता की युएईमध्ये क्वारंटाईनमध्ये राहणे फार कठीण होते. अशा प्रकारच्या क्वारंटाईनमध्ये माझ्या शत्रूलाही ठेवू नये. याबद्दल मी माझ्या भावाला एक सांगितले, त्यानंतर माझ्या भावाने मला विनोद करत विचारले की तुला मर्लोन सॅम्युएल्सला क्वारंटाईनमध्ये ठेवायला आवडेल का?. मी उत्तर दिले की नाही, त्याच्यासाठीसुद्धा नाही. क्वारंटाईनमध्ये राहण्याचा अनुभव खूप वाईट होता.

सॅम्युएल्सला स्टोक्सचं हे विधान चुकीचे वाटले आणि त्याने स्टोक्सच्या पत्नीवर अश्लील भाष्य केले होते.

स्टोक्स आणि सॅम्युएल्स दरम्यान याआधी झाला होता वाद

सन 2015 साली सॅम्युएल्सने ग्रॅनाडा येथे झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंडच्या अष्टपैलू स्टोक्सला बाद केले होते. तेव्हापासून त्यांच्यात वाद सुरु झाला. त्यावेळी सॅम्युएल्सने स्टोक्सला मॉक सॅल्यूट दिला होता. टी20 विश्वचषक 2016 च्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी स्टोक्सने सॅम्युएल्सवर टीका केली होती. या सामन्यात वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ब्रॅथवेटने स्टोक्सला चार चेंडूवर सलग चार षटकार ठोकले होते आणि अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज संघाला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी सॅम्युएल्स नॉनस्ट्राईकर एन्डवर उभा होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

आर्चरकडे खरंच टाईममशीन आहे? ७ वर्षांपूर्वी ट्विटरवरुन केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी

अब आएगा मजा!! ३ जागा, ६ संघ आणि ६ सामने; पाहा कशी आहेत प्लेऑफची समीकरणे

IPL 2020 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत केएल राहुल अव्वल क्रमांकावर कायम, तर पर्पल कॅप ‘या’ खेळाडूच्या डोक्यावर

ट्रेंडिंग लेख

सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार

…आणि १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खेळीने एमएस धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला

त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---