---Advertisement---

दुर्दैवी बेन स्टोक्स, अवघ्या एका धावेने हुकले वनडे शतक; नकोशा यादीत झाला समावेश

---Advertisement---

शुक्रवार रोजी (२६ मार्च) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना रंगला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकात ६ बाद ३३६ धावा केल्या. इंग्लंडने ४३.३ षटकातच भारताच्या ३३७ धावांच्या आव्हानाचा डोंगर सर केला. अशाप्रकारे या रोमहर्षक सामन्यात पाहुण्या इंग्लंडने ६ विकेट्सने बाजी मारली आणि मालिका १-१ ने बरोबरीवर आणली. दरम्यान इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज बेन स्टोक्स याच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.

भारताच्या ३३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो या सलामी जोडीने पंधराव्या षटकापर्यंत शतकी भागिदारी पूर्ण केली. अखेर सोळाव्या षटकात रोहित शर्मा आणि रिषभ पंतने मिळून जेसनला धावबाद करत त्यांची भागिदारी मोडली.

त्यानंतर स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. सुरुवातीला बचावात्मक खेळी करत तो मैदानावर स्थिरावला. पुढे आक्रमक पवित्रा घेत षटकार-चौकारांच्या आतिषबाजीसह त्याने शतकाच्या नजीक धावा केल्या. मात्र ३५.२ षटकात भुवनेश्वर कुमारने रिषभ पंतच्या हातून त्याला झेलबाद केले. त्यामुळे ५२ चेंडूत १० षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने तो ९९ धावा करत तंबूत परतला.

अवघ्या एका धावेने शतक हुकल्यानंतर स्टोक्स नकोशा विक्रमाच्या यादीत सहभागी झाला आहे. भारताविरुद्ध वनडेत ९९ धावांवर बाद होणारा तो इंग्लंडचा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापुर्वी ऍलन लाम्ब आणि ऍंड्र्यू फ्लिंटॉप हेदेखील भारताविरुद्ध वनडेत ९९ धावांवर बाद झाले होते.

भारताविरुद्ध वनडेत ९९ धावांवर बाद होणारे इंग्लंडचे फलंदाज 
ऍलन लाम्ब- १९८२
ऍंड्र्यू फ्लिंटॉप- २००४
बेन स्टोक्स- २०२१

महत्त्वाच्या बातम्या-

INDvENG 2nd ODI: राहुलचे शतक व्यर्थ, बेयरस्टो-स्टोक्स जोडीने साकारला इंग्लंडचा विजय; मालिका १-१ ने बरोबरीत

शतक सोडा स्टोक्स अर्धशतकाच्याही नजीक गेला नसता, पंचांचा ‘तो’ निर्णय बरोबर का चूक? तुम्हीच ठरवा

‘हिटमॅन’ बनला ‘सुपरमॅन’, चपळाईने डाईव्ह मारत ‘असं’ केलं इंग्लिश फलंदाजाला धावबाद; पाहा झक्कास व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---