---Advertisement---

…म्हणून बेन स्टोक्स दुमडतो मधलं बोट, हे आहे कारण

On: शुक्रवार, जानेवारी 10, 2020 1:27 PM
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका आणि इंग्लडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लडने दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात शेवटच्या डावामध्ये इंग्लडने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 438 धावाचे लक्ष्य ठेवले होते.

मात्र या सामन्याच्या शेवटच्या दिवशी 8 षटके शिल्लक राहिले असतान दक्षिण अफ्रिकेचे सर्व खेळाडू बाद झाले आणि इंग्लंडने 189 धावांनी सामना जिंकला. या सामन्यात अष्टपैलू कामगिरीमुळे बेन स्टोक्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

जेव्हा बेन स्टोक्स इंग्लंडचा हा विजय साजरा करत होता तेव्हा त्याने आपले मधले बोट दुमडले होते. हा विजय वडिलांना समर्पित करण्यासाठी त्याने हे केले.

1980 मध्ये, जेव्हा बेन स्टोक्सचे वडील, जेरार्ड स्टोक्स, रग्बी खेळत होते तेव्हा त्यांच्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत झाली होती आणि डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. 

मात्र या शस्त्रक्रियेसाठी पुरेशी रक्कम जवळ नसल्याने त्यांनी त्यांची रग्बी कारकिर्द वाचवण्यासाठी मधले बोट कापण्याचा निर्णय घेतला. जेरार्ड यांच्या या समर्पणाबद्दल आदर म्हणून बेन स्टोक्स त्याचे मधले बोट दुमडतो.

सध्या चालू असलेली दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका पाहण्यासाठी जेरार्ड स्टोक्स दक्षिण आफ्रिकेला आले होते. मात्र ख्रिसमसच्या दोन दिवस आधी ते आजारी पडले. त्यामुळे त्यांना त्वरित दवाखान्यात दाखल करावे लागले होते. सध्या त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.

या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या दुसर्‍या डावात बेन स्टोक्सने 47 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 72 धावांची वेगवान खेळी केली तर गोलंदाजीच्या वेळी त्याने 3 खेळाडू बाद केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---