---Advertisement---

IND vs ENG: बेन स्टोक्सचा धडाकेबाज पराक्रम! शतक ठोकून एका डावात केले ‘हे’ 5 मोठे रेकाॅर्ड

On: शनिवार, जुलै 26, 2025 7:16 PM
---Advertisement---

Ben Stokes Records: इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने भारतीय संघाविरूद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत बॅट आणि बॉल दोन्हीने कमाल केली आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेल्या स्टोक्सने आता मँचेस्टर कसोटी सामन्यात गोलंदाजीने 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने बॅटनेही धमाकेदार शतक झळकावले आहे. या शतकासोबतच स्टोक्सने 5 मोठे रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. स्टोक्सच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावरच इंग्लंड संघाने सामन्यात मोठी आघाडी घेतली आहे.

मँचेस्टर कसोटी सामन्यात बेन स्टोक्सने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये जवळपास 3 वर्षांनंतर शतक झळकावले आहे. यापूर्वी त्याने जवळपास 8 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात स्टोक्सने एकूण 5 मोठे रेकाॅर्ड केले आहेत:

बेन स्टोक्सने केले 5 मोठे रेकाॅर्ड

1) कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटच्या एकाच सामन्यात शतक आणि 5 विकेट्स घेणारा तो इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.

2) खेळाडू म्हणून अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू आहे. त्याच्यापूर्वी इयान बॉथम, गस एटकिंसन आणि टोनी ग्रेग यांनी हा पराक्रम केला होता.

3) कर्णधार म्हणून असा पराक्रम करणारा तो पाचवा खेळाडू आहे. त्याच्यापूर्वी डेनिस एटकिंसन, गॅरी सोबर्स, मुश्ताक मोहम्मद आणि इम्रान खान यांनी एकाच सामन्यात 5 विकेट्स घेतल्यानंतर शतकही झळकावले होते.

4) ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात बेन स्टोक्सने आपल्या कसोटी कारकिर्दीत 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासोबतच तो कसोटी क्रिकेटमध्ये 7 हजार धावा आणि 200+ विकेट्स घेणारा तिसरा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा पराक्रम गॅरी सोबर्स आणि जॅक कॅलिसनेच केला होता.

5) बेन स्टोक्सने या सामन्यात 141 धावा केल्या आहेत. स्टोक्सच्या या खेळीच्या जोरावरच इंग्लंड संघाने 300 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. आता सामना पूर्णपणे इंग्लंडच्या हातात आहे असे दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---