---Advertisement---

खाली डोके वर पाय..! भर सामन्यात बेन स्टोक्सची अतरंगी चाल, पाहून आठवतील बालपणीच्या करामती

---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीने सर्वांचेच मनोरंजन करणाऱ्या बेन स्टोकचे सोमवारी(१५ फेब्रुवारी) नवीन रूप मैदानावर पाहायला मिळाले. सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड कसोटी सामन्यातील सोमवारी तिसरा दिवस संपन्न झाला. या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. अशातच मैदानात नेहमी उत्साहात असणाऱ्या बेन स्टोक्स याने सोमवारी क्षेत्ररक्षण करताना ही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलेले पाहायला मिळाले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना, बेन स्टोक्स क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी स्टोक्सने केलेल्या एका स्टंटमुळे स्टेडियममध्ये बसलेल्या प्रत्येकाचे लक्ष त्याने वेधून घेतले. त्याने सामना सुरू असताना पाय हवेत करत आणि हाथ जमिनीवर ठेवत चालायला सुरुवात केली. हा स्टंट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://twitter.com/StarSportsIndia/status/1361270987140997125

अश्विनने केली दांडी गुल

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन याने भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात ११० धावांची शतकीय खेळी केली. याआधी इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने ५ विकेट्स घेण्याचीही कामगिरी केली. या ५ विकेट्समध्ये बेन स्टोक्सच्या विकेटचाही समावेश आहे.  अश्विनने टाकलेला चेंडू बेन स्टोक्सला कळायचा आधीच त्रिफळा उडवत निघून गेला होता. यानंतर बेन स्टोक्स खूप संतप्त झाला होता. मैदानाबाहेर जाताना त्याने आपले हेल्मेट काढून त्याला लात देखील मारली. हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://twitter.com/gs_hhh/status/1360847652292677634

सामन्यात भारताचे वर्चस्व – 

भारताचा दुसरा डाव २८६ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीसह इंग्लंडला ४८२ धावांचे आव्हान दिले आहे. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ३ बाद ५३ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

शुभमंगल सावधान! ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर बेन कटिंगने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलशी बांधली लग्नगाठ

चांगली खेळी केल्यानंतरही विराट सापडला वादात,स्टीव्ह स्मिथशी केली तुलना

चेन्नईचा सुपर किंग! लाजवाब शतकाने माजी खेळाडूंनीही केला अश्विनला सलाम, ट्विटरवर वाहतोय प्रशंसेचा पूर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---