इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा त्याच्या वनडे कारकिर्दीतील आज (१९ जुलै) शेवटचा वनडे सामना खेळणार आहे. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये महत्वाची खेळी करत संघाला विजय मिळवून दिले आहे. मग तो २०१९ विश्वचषकाचा अंतिम सामना असो वा २०१९ची हेडिंग्ले कसोटी. या दोन्ही खेळी चाहत्यांच्या चांगल्याच लक्षात राहणार आहेत. मात्र यापूर्वी त्याला जीवनाच्या कठीण काळातून जावे लागले होते.
बेन स्टोक्स याला इंग्लंड क्रिकेटचा तारणहार म्हणता येईल. मात्र २०१७, ब्रिस्टलमध्ये त्याच्यासोबत घडलेला किस्सा क्रिकेट चाहते अजूनही विसरणार नाही. झाले असे की, सप्टेंबरमध्ये इंग्लंड आणि विंडिज यांच्यातील वनडे मालिकेदरम्यान स्टोक्सने दारुच्या नशेत दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली होती. हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले होते. ज्यावेळी हे प्रकरण घडले त्यावेळी इंग्लडचा यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स हेल्स देखील उपस्थित होता. तो स्टोक्सला मारहाण करताना रोखण्याचा प्रयत्न करत होता, असे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांने सांगितले.
या प्रकरणानंतर स्टोक्सने सांगितले की, त्याला जरी सर्व आठवत नसले तरी त्या रात्री तो विल्यम ओ’कॉनोर आणि काई बॅरी या दोन तृतीयपंथी व्यक्तींना वाचवण्यासाठी आत गेला होता. पण त्याचवेळी त्याला रायन अली आणि रायन हेल यांच्यापासून स्वत:चा बचाव करावा लागला. या दोघांनी तिथे गोंधळ घातला होता. या घटनेचा व्हिडिओ प्रत्यक्षदर्षी असलेल्या एका विद्यार्थ्यांने काढला होता.
न्यायालयापर्यंत गेलेल्या या प्रकरणामध्ये रेयान हेलने आपली बाजू मांडताना म्हटले, “ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी कसाबसा बेन स्टोक्सच्या तावडीतून सुटलो, नाहीतर त्याने मला जीवे मारले असते.”
स्टोक्सला चौकशीनंतर सोडून देण्यात आले. इंग्लंड क्रिकेट बोर्डने त्याच्यावर कारवाई म्हणून विंडीज विरुद्धच्या ४ थ्या व ५ व्या वनडे सामन्यांसाठी त्याला वगळले. याप्रकरणाच्या न्यायालयीन सुनावनीमुळे स्टोक्सला इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले होते. तसेच त्याची तिसऱ्या कसोटीसाठीही इंग्लंड संघात निवड झाली नव्हती.
स्टोक्स मारहाणीच्या प्रकरणातून निर्दोष सुटला. तरीही त्याला हे प्रकरण चांगलेच भोवले आहे. यापूर्वी स्टोक्सला ऍशेस मालिकेसाठी मुकावे लागले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेत सुरू होतीये मिनी आयपीएल! भारताच्या ‘या’ सहा संघानी लावली बोली