इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (2 मे) वेस्ट इंडीजविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यास सरकारने परवानगी दिली असल्याचे सांगितले. या मालिकेतील तिन्ही कसोटी सामने बंद दारामागे म्हणजेच प्रेक्षकांविना खेळण्यात येणार आहेत.
लॉकडाऊनमुळे (Lockdown) बंद पडलेल्या आतंरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. विशेष म्हणजे ईसीबीने (England and Wales Cricket Board) विंडीजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेचे वेळापत्रकदेखील जाहीर केले आहे.
इंग्लंड आणि विंडीज (England and West Indies) या देशांमधील कसोटी मालिकेची सुरुवात 8 ते 12 जुलै दरम्यान साउथॅंप्टन येथील पहिल्या कसोटी सामन्यापासून होणार आहे.
रुट पहिल्या सामन्यातून होवू शकतो बाहेर
या सामन्याला इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट (Joe Root) अनुपस्थित राहु शकतो. कारण ज्यो रुट यावेळी आपल्या पत्नीसोबत असणार आहे. याच काळात त्याला आपल्या दुसऱ्या आपत्याची प्रतिक्षा आहेत. याबद्दल रुटने नक्की त्यावेळी काय परिस्थिती असेल, हे पाहुन निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
स्टोक्सला आहे कर्णधार होण्याची संधी
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सकडे (Ben Stokes) यावेळी इंग्लंडचे कर्णधार सोपविले जाण्याची शक्यता आहे. याबद्दल इंग्लंडमधील अनेक माध्यमांनी वृत्त दिले आहे.
रुटने केले स्टोक्सचे कौतूक
स्टोक्स ही जबाबदारी योग्यपणे निभावेल. तो एक चांगला खेळाडू आहे. तसेच तो संघातील सर्वच खेळाडूंना सतत प्रेरणा देत असतो. त्याने उपकर्णधार (Vice Captain) म्हणून एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. तो कठीण काळात बॅटसह मैदानावर उभा राहण्याची क्षमता ठेवतो. अनेक खेळाडू त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात, असे रुटने स्टोक्सबद्दल म्हटले आहे.
स्टोक्सची कसोटी कारकिर्द
स्टोक्सने ६५ कसोटी सामन्यात ४०५६ धावा व १४७ विकेट्स घेतल्या आहेत. वयाच्या २८व्या वर्षी खूप कमी खेळाडूंनी एवढे कसोटी सामने खेळले आहे. त्यामुळे निश्चितचं या अनुभवाच्या जोरावर तो एक कर्णदार होवू शकतो.
इंग्लंड आणि विंडीज संघात होणाऱ्या कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
8 ते 12 जुलै- पहिला कसोटी सामना- एजस बाऊल, हॅम्पशायर
16 ते 20 जुलै- दुसरा कसोटी सामना- ओल्ड ट्रॅफर्ड, लँकेशायर
24 ते 28 जुलै- तिसरा कसोटी सामना- ओल्ड ट्रॅफर्ड, लँकेशायर
ट्रेंडिंग घडामोडी-
-चक्क! लॉकडाऊनमध्ये धोनीने विकत घेतला ट्रॅक्टर; पहा तुफान व्हायरल व्हीडिओ
-‘कॅप्टन कूल’ धोनीच्या नेतृत्वात निवृत्ती घेणारे टीम इंडियाचे ३ दिग्गज खेळाडू
-बापरे! टाॅयलेटचं भांड आहे या ६५ शतकं करणाऱ्या खेळाडूच्या यशाचं रहस्य