वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे 10 दिवस उरले आहेत. या विश्वचषकासाठी इंग्लंड क्रिकेट संघाला विजेतेपदाचा दावेदार मानले जात आहे. अशात आता इंग्लंड क्रिकेट संघ या विश्वचषकासाठी आपला माजी कर्णधार ऍण्ड्रू फ्लिंटॉफ याला प्रशिक्षक म्हणून भारतात घेऊन येऊ शकते. इंग्लंडचा अनुभव अष्टपैलू बेन स्टोक्स याने याबाबतचे संकेत दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर फ्लिंटॉफने प्रोफेशनल बॉक्सिंग आणि टेलिव्हिजन अशा विविध क्षेत्रांमध्ये हात आजमावला. मात्र त्यामध्ये फारसे यश त्याला मिळाले नाही. नऊ महिन्यांपूर्वी त्याचा एक गंभीर अपघात झाला होता. त्यातून सावरल्यानंतर नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग बनलेला. विशेष म्हणजे त्यासाठी त्याला कोणतेही मानधन देण्यात आले नव्हते. तो सपोर्ट स्टाफचा भाग झाल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केलेला. भविष्यात तो संघाचा प्रशिक्षक होईल का याबाबत विचारले असताना स्टोक्स म्हणाला,
“क्रिकेट कारकिर्दीनंतर त्याचे व्यक्तिमत्त्व टीव्हीसाठी परिपूर्ण होते. परंतु नंतर तुम्ही त्याला परत आल्याचे पाहिले. तुम्ही त्याला संघाचे पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणूनही पाहू शकता. त्याचा सहवास संघातील प्रत्येक खेळाडूला आवडला. या संपूर्ण प्रकरणानंतर त्याचा देखील आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल.
फ्लिंटॉफ हा संघाशी मिसळल्याने आगामी विश्वचषकासाठी त्याचा संघाच्या प्रशिक्षकांमध्ये सहभाग होऊ शकतो. त्याला भारतात खेळण्याचा पुरेसा अनुभव होता. त्यामुळे तो अनुभव आपल्या खेळाडूंसोबत वाटू शकतो.
विश्वचषकासाठी इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोप्ली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स
(Ben Stokes Hints Andrew Flintoff Will Be Coach England In World Cup)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपच्या सर्वच VIP सामन्यांचे यजमानपद मिळालेले श्री नरेंद्र मोदी स्टेडियम
‘किलर मिलर’ ठरणार वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा तारणहार? त्याची बॅट भारतात बोलतेच