---Advertisement---

World Cup 2023 । स्पर्धेच्या एक दिवस आधी इंग्लंडची ताकद झाली कमी, दिग्गज खेळाडू संघातून बाहेर!

On: बुधवार, ऑक्टोबर 4, 2023 4:57 PM
Jos Buttler Ben Stokes
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023चा पहिला सामना गुरुवारी (5 ऑक्टोबर) अहमदाबादमध्ये आयोजित केला गेला आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड संघातील हा सामना रोमांचक होण्याची पूर्ण शक्यता आहे. पण या सामन्याआधी बुधवारी (4 ऑक्टोबर) इंग्लंड संघाची आणि त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

बेन स्टोक्स (Ben Stokes) याने वनडे विश्वचषक 2023 साठी आपली वनडे क्रिकेटमधून घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. पण वनडे विश्वचषक सुरू होण्याआदी त्याला दुखापत झाल्याचे समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार स्टोक्सच्या खुब्याला दुखापत झाली आहे. या तक्रारीमुळेच विश्वचषकातील पहिल्या सामन्यातून स्टोक्स माघार घेऊ शकतो. कर्णधार जोस बटलर यानेही याविषयी चिंता व्यक्त केली आहे. जोस बटलर याने दिलेल्या माहितीनुसार बेन स्टोक्सला भुब्याची तक्रार जाणवत आहे. याच कारणास्तव तो विश्वचषकातील पहिल्या सामन्यातून माघार घेऊ शकतो. संघ व्यवस्थापन गुरुवारी (5 ऑक्टोबर) सकाळी याविषयी निर्णय घेईल.

विश्चषकासाठी निवडलेला इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशिद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

विश्वचषकासाठी निवडलेला न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिचल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, विल तरुण. (Ben Stokes is likely to miss the World Cup opener match against New Zealand)

महत्वाच्या बातम्या –
World Cup 2023 । कर्णधारांच्या कार्यक्रमात रोहितचे मजेशीर उत्तर, बाबर आझमची प्रतिक्रियाही चर्चेत
Asian Games: बांगलादेशची सेमी फायनलमध्ये एन्ट्री, मलेशियन खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू; भारताशी करणार दोन हात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---