---Advertisement---

जॉस बटलरच्या आक्रमक खेळीने बेन स्टोक्सही भलताच प्रभावित; ट्वीट करत म्हटला…

On: बुधवार, नोव्हेंबर 3, 2021 12:51 AM
---Advertisement---

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२१ चा २९ वा सामना सोमवारी (१ नोव्हेंबर) शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात इंग्लंड संघाने श्रीलंकेच्या संघाचा २६ धावांनी पराभव केला आणि २०२१ च्या टी२० विश्वचषकात सलग चौथे यश मिळविले. या सामन्याचा नायक ठरला यष्टीरक्षक जॉस बटलर. इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने त्याचे कौतुक करत खास ट्वीट केले आहे.

सध्या आपल्या मानसिक आरोग्याच्या कारणामुळे बेन स्टोक्सने टी२० विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली होती. पण शारजाह क्रिकेट स्टेडियमवर बटलरची सुरेख फलंदाजी पाहून बेन स्टोक्स बटलरचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. या अष्टपैलू खेळाडूने बटलरची प्रशंसा करत ट्वीट केले, ‘जगातील सर्वोत्तम जॉस बटलर.’ यासोबत त्याने टाळ्यांचा एक इमोजीही टाकला.

सामन्यादरम्यान, ३१ वर्षीय इंग्लिश यष्टीरक्षक आणि सलामीवीर जॉस बटलरचा शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झंझावात दिसला. त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर एक टोक लावून धरले आणि १०१ धावांची नाबाद शतकी खेळी केली. या सामन्यादरम्यान त्याने अनेक मोठे विक्रमही केले. यासोबतच इंग्लंडसाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे.

जॉस बटलर आता त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये नंबर १ चा फलंदाज बनला आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने पहिले स्थान पटकावले आहे. या फलंदाजाने ४ सामन्यात ५५ च्या सरासरीने २१४ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. केवळ ४ सामन्यात बटलरने १२ षटकार आणि १५ चौकार मारले आहेत.

बटलरचा हा फॉर्म इंग्लंडसाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण या खेळाडूची बॅट अशीच तळपत रहाणे सुरू राहिली, तर इंग्लिश संघाला दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘टी२० विश्वचषकही आयपीएलसमोर फिका वाटतो,’ सुनिल गावसकरांचे मोठे वक्तव्य

‘भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट गांभीर्याने घेत नाही, त्यांना आयपीएल पुरेसे वाटते’, माजी क्रिकेटरने टोचले कान

यंदा टी२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला पराभूत करण्याची क्षमता केवळ ‘या’ दोन संघात, केविन पीटरसनचा दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---