इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटी चांगलीच रोमांचक झाली. ऍशेस 2023 मधील हा दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने 43 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्स याने चौथ्या डावात एकाकी झुंज दिली. त्याने आक्रमक दीड शतक झळकावले. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. असे असले तरी त्याने या खेळी दरम्यान एक विश्वविक्रम रचला.
इंग्लंडला शेवटच्या दिवशी 256 धावांची आवश्यकता होती. चौथ्या दिवसाखेर त्यांनी 4 बाद 114 धावा केल्या होत्या. बेन स्टोक्स आणि बेन डकेट यांनी इंग्लंडसाठी शेवटच्या दिवसाची सुरुवात केली. पहिल्याच सत्रात डकेट व जॉनी बेअरस्टो बाद झाल्यानंतर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी स्टोक्सने आपल्या खांद्यावर घेतली. त्याने तुफानी फटकेबाजी करताना आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेले.
इंग्लंडला विजयासाठी 70 धावांची आवश्यकता असताना तो बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने 214 चेंडूंमध्ये 9 चौकार व 9 षटकारांच्या मदतीने 155 धावा केल्या. यासह तो चौथ्या डावात शतक झळकावणारा इंग्लंडचा पहिला कर्णधार बनला. यासोबतच तो सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज बनला. यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ऍडम गिलख्रिस्ट याच्या नावे होता. त्याने 1999 मध्ये होबार्ट येथे पाकिस्तान विरुद्ध 149 धावांची खेळी केली होती.
इंग्लंड संघ या सामन्यात पराभूत झाल्याने त्यांना आता मालिकेतील पुढील तीनही सामने जिंकावे लागतील. यातील एक सामना जरी अनिर्णित राहिला तरी, ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा ऍशेस आपल्याकडे राखण्यात यशस्वी होईल.
(Ben Stokes Register Highest Test Individual Score At Lords After Bat At Number 6 Broke Adam Gilchrist Record)
महत्वाच्या बातम्या –
बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! मोनिका पटेलला संधी, श्रेयंका पाटीलकडे दुर्लक्ष
वानखेडेवर रंगणार 2011 वर्ल्डकप फायनलचा रिमेक! असे आहे श्रीलंका संघाचे वेळापत्रक