इंडियम प्रीमियर लीग 2023 च्या हंगामासाठीचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचिमध्ये पार पडला. यामध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि अष्टपैलू बेन स्टोक्स याला चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केले. त्याला चेन्नईने 16.25 कोटी रुपयांमध्ये संघात घेतले. टी20 लीग खेळण्यासाठी इतकी तगडी रक्कम मिळूनही, स्टोक्स याने टी20 क्रिकेट वरच टीका केली आहे.
स्टोक्सने 2019 चा वनडे विश्वचषक आणि 2022 चा टी20 विश्वचषक या आयसीसी स्पर्धांमध्ये महत्वाची भुमिका पार पाडली. याचाच परिणाम म्हणून त्याला आपल्या संघात घेण्यासाठी लिलावामध्ये अनेक संघांमध्ये चढाओढ निर्माण झाली होती. त्यामध्ये अखेर चेन्नईने बाजी मारली आणि त्याला तगडी रक्कम देत आपल्या ताफ्यात सामील केले. स्टोक्स यापूर्वी देखील आयपीएलमध्ये दोन वेळा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला.
हे सर्व असले तरी स्वतः स्टोक्स मात्र टी20 क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटला धोका असल्याचे म्हणतो. एका कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला,
“सध्या लोक कसोटी क्रिकेटबद्दल फारसे बोलताना दिसत नाहीत. चाहत्यांना कसोटी क्रिकेटपेक्षा झटपट खेळले जाणारे टी20 क्रिकेट आवडते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळाडूंना संधी मिळते हे खरे आहे. मात्र, क्रिकेटसाठी कसोटी क्रिकेटदेखील टिकणे महत्त्वाचे वाटते. कसोटी क्रिकेटला अधिक मनोरंजक बनवण्यासाठी इतर संघांनीही आक्रमक क्रिकेट खेळण्यावर भर द्यायला हवा. मला स्वतःला कसोटी क्रिकेट अधिक खेळायला आवडते.”
बेन स्टोक्स याने नेतृत्व स्वीकारल्यापासून इंग्लंडचा कसोटी संघ एक वेगळ्याच पद्धतीने खेळताना दिसतो. त्यांनी कसोटी क्रिकेट अधिक आक्रमक पद्धतीने खेळले आहे. त्यामुळेच इंग्लंड 10 पैकी 9 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला. त्यांच्या या खेळाच्या प्रकाराला अनेक जण बॅझबॉल क्रिकेट असे म्हणतात.
(Ben Stokes Said T20 Leagues Dangerous For Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह कार्यक्रमात गेलचा अनिल कुंबळेंवर आयपीएल कारकीर्द संपवल्याचा आरोप; म्हणाला…
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून रोहित-राहुलचा पत्ता कट? कारणही घ्या जाणून





