---Advertisement---

वेस्ट इंडिजविरुद्ध बेन स्टोक्सचं वादळ! कसोटीतील 43 वर्ष जुना विक्रम मोडला

On: सोमवार, जुलै 29, 2024 10:50 AM
Ben Stokes
---Advertisement---

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सनं वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सलामीला येत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कॅरेबियन संघानं यजमानांसमोर विजयासाठी केवळ 81 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.

या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी बेन डकेटसह स्वतः कर्णधार मैदानात उतरला. या सामन्यात स्टोक्सनं असा धमाका केला, जो क्रिकेटप्रेमींना दीर्घकाळ लक्षात राहील. बेन स्टोक्सनं अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक झळकावलं. यासह तो इंग्लंडसाठी कसोटीमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा खेळाडू बनला. याशिवाय स्टोक्सनं अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. इंग्लंडनं 81 धावांचं लक्ष्य अवघ्या 7.2 षटकात गाठलं.

सर्व प्रथम आपण बेन स्टोक्सच्या खेळीबद्दल बोललं, तर त्यानं 28 चेंडूत 9 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांच्या मदतीनं 57 धावांची शानदार खेळी केली. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 203.57 होता. यासह बेन स्टोक्स इंग्लंडसाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. तसेच कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे तिसरं सर्वात जलद अर्धशतक ठरलं. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम (21 चेंडू) पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हकच्या नावावर आहे. बेन स्टोक्सच्या आधी इंग्लंडसाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम इयान बॉथमच्या नावावर होता, ज्यानं 1981 मध्ये भारताविरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे फलंदाज 

21 चेंडू – मिसबाह-उल-हक (पाकिस्तान) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2014
23 चेंडू – डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध पाकिस्तान, 2017
24 चेंडू – जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध झिम्बाब्वे, 2005
24 चेंडू – बेन स्टोक्स (इंग्लंड) विरुद्ध वेस्ट इंडिज, 2024
25 चेंडू – शेन शिलिंगफोर्ड (वेस्ट इंडिज) विरुद्ध न्यूझीलंड, 2014

वेस्ट इंडिजनं दिलेल्या 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनं अवघ्या 4.2 षटकांत 50 धावांचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघानं केलेलं हे संयुक्त सर्वात जलद अर्धशतक आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या याच कसोटी मालिकेत इंग्लंडनं 4.2 षटकांत अर्धशतक ठोकलं होतं.

कसोटी सामन्यातील सर्वात जलद अर्धशतक

4.2 षटकं – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, ट्रेंट ब्रिज, 2024
4.2 षटकं – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, एजबॅस्टन, 2024
4.3 षटकं – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ओव्हल, 1994
5 षटकं – इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, ओल्ड ट्रॅफर्ड, 2002
5.2 षटकं – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, कराची, 2004

हेही वाचा – 

यशस्वीनं केली विराटच्या विक्रमाची बरोबरी, वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी केला हा पराक्रम
यशस्वीचा धमाका, बिश्नोईच्या फिरकीची जादू….भारतानं श्रीलंकेविरुद्धची मालिका सहज खिशात घातली
फलंदाजीत फेल, क्षेत्ररक्षणात चूक; आशिया चषक गमावल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर होतेय ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---