इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. हा सामना क्रिकेटची पंढर समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवला गेला. यावेळी दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर तब्बल १ डाव आणि १२ धावांनी मात केली. त्यानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टेक्स याने विशेष प्रतिक्रिया दिली आहे.
स्टोक्स म्हणाला की, “आमच्यासाठी हा खेळ पूर्णपणे संपला होता पण त्यामुळे फारसा फरक पडत नाही. आम्ही आमची कामगिरी सुधारण्यावर भर देऊ. आम्ही पुढच्या कसोटी सामन्यात पुन्हा नव्या जोशात उतरू आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करू.” त्यामुळे आता स्टोक्स आणि इंग्लंड संघाने रणशिंग फुंकले असल्याचे जाहीर होत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘आता तरी त्यांना संधी द्या’; विश्वविजेत्या फलंदाजाची टीम मॅनेजमेंटकडे मागणी