तीन वर्षापूर्वी इंग्लंडने न्यूझीलंडला हरवून विश्वचषकावर पहिल्यांदा आपले नाव कोरले होते. इंग्लंडच्या या विजयावर एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात विश्वचषकातल्या अनेक आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषकातील हिरो अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने ‘सुपर ओव्हर’ पूर्वी स्वतःला तणावमुक्त करण्यासाठी ‘सिगारेट ब्रेक’ घेतला होता.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या विश्वचषकातील अंतिम सामना हा बरोबरी सुटला होता. त्यानंतर सुपर ओव्हर खेळविण्यात आला. सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली. त्यामुळे संपूर्ण सामन्यात सर्वाधिक चौकार मारल्याने इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले.
या ऐतिहासिक घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ‘मॉर्गन मेन: द इनसाइड स्टोरी ऑफ इंग्लैंड राइज ऑफ क्रिकेट वर्ल्ड कप ह्यूमिलीऐशन टु ग्लोरी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. लॉर्डसच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात बेन स्टोक्स (Ben Stokes) कसा दबावामध्ये होता याचा खुलासा या पुस्तकात केला आहे.
निक हॉल्ट आणि स्टीव जेम्स द्वारा लिखीत या पुस्तकात सांगितले की, सुपर ओव्हरपुर्वी 27 हजार लोकांनी स्टेडियम खचाखच भरले होते. प्रत्येक ठिकाणी कॅमेऱ्याची नजर होती. त्यात एकांत शोधणे मुश्कील होते.
पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी बेन स्टोक्स अनेकदा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला होता. त्याला इथला प्रत्येक कोपरा माहित होता. इयॉन मॉर्गन इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच सुपर ओव्हरचे तो नियोजन करण्यात व्यस्त होता. त्यावेळी स्टोक्स मात्र एकांतात बसलेला दिसून आला.
तब्बल दोन तास सत्तावीस मिनिटे फलंदाजी केल्याने स्टोक्स घामाने भिजला होता. ड्रेसिंग रुममध्ये आल्यानंतर तो शॉवरकडे गेला. तिथे तो सिगारेट ओढत शांतपणे बसला होता. स्वतःला तणाव मुक्त होण्याचा प्रयत्न करत होता. अंतिम सामन्यात त्याने नाबाद 84 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. त्याचबरोबर सुपर ओव्हरमध्ये त्याने 8 धावा केल्या होता. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडने पहिल्यांदा विश्वचषकावर मोहोर लावली. तसेच त्यांच्या बहारदार कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या
ब्रेकिंग! या देशातील आणखीन एका दिग्गजाची निवृत्ती, क्रिकेटविश्वाला धक्का
आर माधवनचा मुलगा वेदांतने मोडला नॅशनल रेकॉर्ड, सुवर्णपदकाची केली कमाई
स्टोक्सच्या निवृत्तीनंतर विराटने दिली मन जिंकणारी प्रतिक्रिया; म्हणाला,”तू माझ्या करिअरमधील…”