ऍशेस 2023च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने विजय मिळवला. बर्मिंघमच्या एजबस्टन कसोटीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्स राखून विजय मिळवला. असे असले तरी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांच्या नेतृत्वगुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण श्रीलंकेचा माजी दिग्गज कर्णधार कुमार संगकारा याने बेन स्टोक्स आणि एमएस धोनी यांच्या नेतृत्वातील सामन्य शोधून काढले.
एजबस्टन कसोटीत विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ ऍशेस 0-1 अशा आघाडीवर आहे. या सामन्यादरम्यान बेन स्टोक्स (Ben Stokes) यांच्या नेतृत्वाविषयी चांगलीच चर्चा झाली. खासकरून स्टोक्सने लावलेल्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक झाले. स्टोक्सने लावलेले क्षेत्ररक्षण पाहून समालोचन करणाऱ्या कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याला भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याची आठवण आली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या डावात 281 धावांचे लक्ष्य मिळाले होते, तर शेवटच्या दिवशी त्यांना 174 धावा हव्या होत्या. यादरम्यान ट्रेविस हेड (Travis Head) स्ट्राईकवर असताना स्टोक्सने फलंदाजाच्या अघदी समोर एक क्षेत्ररक्षण उभा केला.
स्टोक्सने फलंदाजाच्या समोर आणि गोलंदाजाच्या अगदी मागे हा क्षेत्ररक्षण उभा केल्याचे पाहताच कुमार संगकाराला एमएस धोनी आठवला. समालोचन करताना संगकारा म्हणाला, “हे अगदीच एमएस धोनीसारखे श्रेत्ररक्षण आहे. आयपीएलमध्ये धोनी कायरन पोलार्ड (Kieron Pollard) साठी असेच श्रेत्ररक्षण लावायचा. धोनी गोलंदाजाच्या ठीक मागे क्षेत्ररक्षक उभा करायचा. बेन स्टोक्स देखील सीएसके संघाचा बाग राहिला आहे.”
दरम्यान, स्टोक्सने लावलेले क्षेत्ररक्षण कामी आले. समोरच्या दिशेला खेळाडू उभा असल्यामुळे हेड मोठा शॉट खेळण्या धाडस दाखवत नव्हता. दबावात येऊन त्याने स्लिप्समध्ये जो रुटच्या हातात झेल दिला. पोलार्ड देखील समोरच्या दिशेने षटकार मारण्याची संधी सोडत नव्हता. पण दोनीपुढे अनेकदा त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. आयपीएल 2010च्या अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी धोनीची ही चाल मुंबई इंडियन्सला चांगलीच महागात पडली होती.
Sangakkara said "This is like MS Dhoni captaincy, he used to do for Pollard in IPL, fielder straight behind bowlers arm – Stokes was in CSK as well". pic.twitter.com/aiokacHBtz
— Johns. (@CricCrazyJohns) June 20, 2023
Field set by MS Dhoni, next ball Kieron Pollard out. pic.twitter.com/qmg00JFwMM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 21, 2022
दरम्यान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या पहिल्या ऍशेस कसोटीचा विचार केला, तर पहिल्या डावात इंग्लंडने 8 बाद 393 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 386 धावांवर गुंडाळला गेला. दुसऱ्या डावात इंग्लंड संघ अवघ्या 273 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी विजय सोपा दिसू लागला. मात्र, शेवटच्या दिवशी पावसामुळे पहिले सत्र रद्द झाले आणि इंग्लंडच्या विजयाच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या. शेवटच्या दिवशी नवव्या विकेटसाठी पॅट कमिन्स आणि नेथन लायन यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आणि या दोघांनीच ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. ऍशेसचा दुसरा सामना लॉर्ड्सवर 28 जून ते 2 जुलैदरम्यान खेळला जाणार आहे. (Ben Stokes used MS Dhoni’s strategy in the Edgbaston Test, says Kumar Sangakkara)
महत्वाच्या बातम्या –
एमएस धोनी-रविंद्र जडेजात खरंच वाद आहे? सीएसकेच्या प्रमुख अधिकाऱ्याकडून समजले सत्य
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला पहिल्याच घासाला खडा! आयसीसीची मोठी कारवाई; नव्या डब्ल्यूटीसी हंगामातही नुकसान