आयपीएल 2023 हंगामातील आपला चौथा सामना खेळण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज तयार आहे. बुधवारी (12 एप्रिल) सीएसके आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आमना सामना होणार आहे. पण तत्पूर्वी सीएसकेचा प्रमुख अष्टपैलू बेन स्टोक्स याच्याविषयी भारतीय संघाच्या माजी दिग्गजाने मोठी प्रतिक्रिया दिली. स्टोक्स दुखापतीच्या कारणास्तव मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला नव्हता. पण भारतीय दिग्गजाच्या मते राजस्थानविरुद्धच्या सामन्यात स्टोक्स फिट असला, तरी त्याला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसवले जाऊ शकते.
बुधवारी सायंकाळी 7.30 वाजता चेपॉक स्टेडियवर एमएस धोनी (MS Dhoni) याचा चेन्नई सुपर किंग्ज आणि संजू सॅमसन (Sanju Samson) याचा राजस्थान रॉयल्स संघ आमने सामने असतील. दोन्ही संघा आपल्या सर्वोत्तम 11 खेळाडूंसह मैदानात उतरतील. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. मात्र, बुधवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याला बेंचवर बसून शकते, असे आकाश चोप्रा (Akash Chopra) याला वाटते. तसेच स्टोक्स राजस्थानविरुद्धच्या या सामन्याआधी पूर्णपणे फिट होईल, अशी शक्यता देखील कमीच आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर आकाश चोप्राने सीएसके आणि राजस्थान सामन्यापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला. यात आकाश चोप्राने स्टोक्सविषयी आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मला वाटत नाही की, आज सीएसकेसाठी खेणाऱ्या चार विदेशी खेळाडूंमध्ये स्टोक्सचे नाव असेल. सीएसकेकडे मागच्या सामन्यात मोईन अली आणि बेन स्टोक्स नव्हते. बेन स्टोक्स संघात असो किंवा नसो, काहीच फरक पडणार नाही. मला नाही वाटत की स्टोक्स उपलब्ध असला, तरी त्याला खेळण्याची संधी मिळेल. ही एक शक्यता आहे.”
दरम्यान, स्टोक्सने हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सीएसकेसाठी 15 धावा केल्या आहेत. तसेच लखनऊविरुद्ध टाकलेल्या एका षटकात त्याने 18 धावा खर्च केल्या. अशात आकाश चोप्रा म्हटल्याप्रमाणे संघ व्यवस्थापनाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्टोक्सची निवड करण्याआधी विचार करावा लागू शकतो. माहितीनुसार स्टोक्सच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता.
मोईन अली खेळणे सीएसकेसाठी महत्वाचे – आकाश चोप्रा
“असे असले तरी, मोईन अलीच्या अनुपस्थितीत सीएसके अडचणी येऊ शकतात. मोईन अळीला या सामन्यात खेळण्यासाठी फिट असणे गरजेचे असेल. महीश तिक्षणा देखील उपलब्ध आहे. तो न्यूझीलंडविरुद्ध संघासाठी खूप फायदेशीर ठरल्यानंतर आयपीएलमध्ये खेळणार आहे. त्यामुळे त्याला सिसांडा मगानाच्या जागी संधी मिळू शकते,” असेही चोप्रा व्हिडिओत म्हणाला. (Ben Stokes won’t play despite being fit! Former legend’s prediction ahead of Chennai-Rajasthan match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मातील सूर्यकुमारला गुरू रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, फलंदाज पुन्हा पाडणार धावांचा पाऊस?
पियुष चावला ईज बॅक! ललित यादवचा त्रिफळा उडवत नावावर केला आयपीएलमधील मोठा विक्रम