बिस्ट्रॉल नाईट क्लबच्या बाहेर केलेल्या मारामारी प्रकरणात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स, रायन अली आणि रायन हेल यांना क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस (सीपीएस) यांनी दोषी ठरवले आहे.
याबद्दल स्टोक्सने त्याच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, “बिस्ट्रॉल प्रकरणात ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचा मी आभारी आहे. यात माझे कुटुंबीय, मित्र, चाहते आणि संघ मित्रांनी मला पाठिंबा दिला. मी माझ्या कृत्याबद्दल सगळी माहिती पोलिसांना ज्या दिवशी हे प्रकरण त्याच्या पहिल्याच दिवशी दिली आहे आणि प्रत्येक पोलीस चौकशीत मी त्यांना सहकार्य केले आहे.”
“मी माझे नाव निर्दोष म्हणून सिद्ध करण्यासाठीच्या संधी साठी उत्सुक आहे. पण न्यायालयात हे प्रकरण येईल तेव्हा निर्दोष सिद्ध करण्यासाठी ती योग्य वेळ असेल. मला, रायन अलीला आणि रायन हेलला सीपीएसने दोषी ठरवले आहे. याचाच अर्थ मला त्या रात्री जे झाले ते कोर्टात सर्वांसमोर मांडता येणार आहे. तोपर्यंत माझे संपूर्ण लक्ष क्रिकेटवरच राहणार आहे.”
https://twitter.com/benstokes38/status/952922187362717698
बिस्ट्रॉल मारामारी प्रकरणामुळे बेन स्टोक्सला अटकही करण्यात आली होती. त्याला चौकशीनंतर सोडून देण्यात आले होते. पण या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली नसल्याने त्याच्यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेटने त्याच्यावर बंदी घातली होती. या बंदीमुळे बेन स्टोक्सला नुकत्याच पार पडलेल्या ऍशेस मालिकेत खेळाता आले नव्हते.