---Advertisement---

‘नवीन एक्सप्रेस’ची ऐतिहासिक कामगिरी! दबंग दिल्लीकडून गतविजेता बंगाल नामोहरम

naveen-kumar
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम बेंगलोर येथे सुरू आहे. हंगामाच्या आठव्या दिवशी गेल्या हंगामाची अंतिम फेरी खेळलेले दबंग दिल्ली व बंगाल वॉरियर्स हे संघ आमनेसामने आले. अगदी पहिल्या मिनिटापासून दबंग दिल्ली संघाने या सामन्यावर वर्चस्व राखले. पूर्ण वेळेनंतर दिल्ली संघाने ५२-३५ अशा फरकाने सामना आपल्या नावे केला.

सामना सुरू झाल्यापासून दिल्ली संघाचा हुकमी एक्का असलेल्या नवीन कुमारने बंगालला चांगलेच सतावले. पहिला हाफ संपूर्णपणे त्याने आपल्या नावे केला. त्याने १४ चढाया करत तब्बल १६ गुण आपल्या नावे केले. यासह पहिल्या हाफमध्ये दिल्लीने ३३-१५ अशी आघाडी घेतली होती.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला बंगालने दिल्लीला ऑल आउट करत चांगली सुरुवात केली. मात्र, नवीन व विजय मलिक यांनी सातत्याने एकेरी दुहेरी गुण मिळवत बंगालला जवळपास येऊ दिले नाही. नविनने संपूर्ण सामन्यात तब्बल २४ गुण मिळवत एक ऐतिहासिक कामगिरी केली. बंगालसाठी कर्णधार मनिंदर सिंग याने केलेले प्रयत्न अखेरीस तोकडे पडले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---