Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंगळुरू एफसीचा सहज विजय; जमशेदपूर एफसीचा सलग सातवा पराभव

बंगळुरू एफसीचा सहज विजय; जमशेदपूर एफसीचा सलग सातवा पराभव

December 18, 2022
in टॉप बातम्या, फुटबॉल
Bengaluru FC vs Jamshedpur FC

Photo Courtesy: Twitter/ Indian Super League


हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 ( आयएसएल) मध्ये शनिवारी बंगळुरू एफसीने 1-0 अशा फरकाने जमशेदपूर एफसीवर विजय मिळवला. बंगळुरूने हा सामना आणखी मोठ्या फरकाने जिंकला असता. पण, त्यांचे काही प्रयत्न गोलपोस्टला लागून अयशस्वी ठरले, तर काही जमशेदपूरचा गोलरक्षक विशाल यादवने रोखले. त्यातुलनेत जमशेदपूर एफसीने बरोबरीचा गोल करण्याचे अनेक सोपे प्रयत्न गमावले आणि त्यांना सलग सातवा पराभव पत्करावा लागला. नॉर्थ ईस्ट युनायटेड नंतर यंदाच्या पर्वात सलग सात पराभवांचा नकोसा विक्रम जमशेदपूरने नावावर केला. दानिश फारूकने पाचव्या मिनिटाला केलेला गोल बंगळुरू एफसीच्या विजयात निर्णायक ठरला.

जमशेदपूर व बंगळुरू यांच्यात हिरो आयएसएलमध्ये दहा सामने झाले आणि त्यात जमशेदपूरने चार विजय मिळवले आहेत. बंगळुरूने तीन विजय मिळवले आहेत, परंतु यंदाच्या पर्वात जमशेदपूरची गाडी गडगडल्याचे दिसतेय. बंगळुरू एपसीचा खेळ काही चांगला झालेला नाही, परंतु जमशेदपूरपेक्षा त्यांचा खेळ वरचढ आहे. पाचव्याच मिनिटाला बंगळुरूने त्याची प्रचिती दिली. रॉय कृष्णा, झेव्हियर हर्नांडेझ आणि सुनील छेत्री (Sunil Chhetri) या तीन स्टार खेळाडूंनी जमशेदपूरची बचावफळी खिळखिळीत केली. कृष्णाने दिलेल्या पासवर दानिश फारूकने गोल केला आणि बंगळुरूने 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर जमशेदपूरने कडवी टक्कर दिली. 19व्या मिनिटाला थ्रो ईन द्वारे आलेला चेंडू व्हॉलीद्वारे जमशेदपूरच्या खेळाडूने गोलजाळीच्या दिशेने टोलावला, पण बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत संधूने तो अडवला अन् बरोबरी झाली नाही.

एली साबियाने 27व्या मिनिटाला चेंडूवर ताबा राखताना इशान पंडितासाठी गोल करण्याची संधी निर्माण केली. पण, पंडिताने बराच वेळ घेतला आणि संदेश झिंगनला त्याला रोखण्याची संधी मिळाली. जमशेदपूर पुन्हा अपयशी ठरले. 40व्या मिनिटाला हर्नांडेझने जमशेदपूर एफसीच्या बचावपटूंना गोंधळात टाकले. नामग्याल भुटियाला अंतिम टच देऊन चेंडू गोलजाळीत टाकता आला असता, पण जमशेदपूरच्या लालदिंलियाना रेनथलेईने बचाव केला. पहिल्या हाफमध्ये यजमान बंगळुरूचा खेळ उजवा राहिला. मध्यंतरानंतरही बंगळुरूकडून आक्रमण सुरू राहिले आणि 48व्या मिनिटाला जमशेदपूरचा गोलरक्षक विशाल यादवने सुरेख बचाव केला. 50व्या मिनिटाला हर्नांडेझचा आणखी एक प्रयत्न पोस्टला लागून अयशस्वी ठरला अन् बंगळुरूचा दुसरा गोल होता होता राहिला.

THAT'S THAT AT THE FORTRESS. COME ON, BFC! 🔥#WeAreBFC #BFCJFC #NothingLikeIt pic.twitter.com/Eqz7hnLCFk

— Bengaluru FC (@bengalurufc) December 17, 2022

हर्नांडेसने दुसऱ्या हाफमध्ये पहिल्या 15 मिनिटांत जमशेदपूरच्या बचावफळीवर दडपण निर्माण केले होते. 61व्या मिनिटाला जमशेदपूरकडून प्रथमच आक्रमण झालेले दिसले आणि सलग तीन कॉर्नर मिळूनही त्यांना गोल करता आला नाही. 65व्या मिनिटाला जमशेदपूरचा इशान पंडिता चेंडू लक्ष्याचा दिशेने ठेऊ शकला नाही. दोन मनिटानंतर पुन्हा पंडिताने बरोबरी मिळवण्याची संधी गमावली. दुसऱ्या हाफमध्ये जमशेदपूरचा बचाव चांगला राहिला, परंतु आक्रमणपटूंना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. बरोबरीचा गोल करण्याची संधी ताळमेळ नसल्यामुळे त्यांनी अनेकदा गमावली. 80व्या मिनिटाला बंगळुरूचा दुसरा गोल विशाल यादवने रोखला. बंगळुरूने 1-0 अशा विजयासह तालिकेत एक स्थान वर झेप घेत आठवे स्थान पटकावले.

निकाल : बंगळुरू एफसी 1 ( दानिश फारूक 5 मि. ) विजयी वि. जमशेदपूर एफसी 0.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूच्या हातावर भारताची मेहंदी, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘भारीच की..’
स्टंपिंगचा ‘हा’ व्हिडिओ एकदा पाहाच; तुम्हीही म्हणाल, ‘रिषभ पंतच बनणार पुढचा धोनी’


Next Post
ML Jaisimha

तब्बल 505 मिनिटे फलंदाजी अन् 99 धावांवर बाद, वाचा गावसकरांच्या 'हिरो'च्या खेळीबद्दल सविस्तर

FC Goa vs NorthEast United FC

एफसी गोवाचा वर्चस्वपूर्ण विजय, नॉर्थ ईस्ट युनायटेडचा सलग दहावा पराभव

Croatia vs Morocco

FIFA WC 2022: आक्रमक क्रोएशिया मोरोक्कोवर भारी, तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात थरारक विजय

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143