Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूच्या हातावर भारताची मेहंदी, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘भारीच की..’

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूच्या हातावर भारताची मेहंदी, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, 'भारीच की..'

December 18, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Amanda Wellington

Photo Courtesy: Twitter/amandajadew


महिलांना हातावर काढलेली मेहंदी शोभून दिसते. लग्न समारंभांमध्ये मेहंदी काढण्याची प्रथा संपूर्ण भारतात चालत आली आहे. पण विदेशी महिलांमध्येही मेहंदी काढण्यासाठी उत्सुकता असते. कारण विदेशात त्यांना हा अनुभव घेता येत नाही. सध्या भारत दौऱ्यावर असेलल्या ऑस्ट्रेलियम महिला संघातील एका खेळाडूने नेमकी हीच संधी साधून हातांवर सुंदर अशी मेहंदी काढली आहे. 

ऑस्ट्रेलियन महिला संघ सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात आला आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू खेळासोबतच भारतातील इतर गोष्टींचा देखील आनंद घेत आहेत. त्यांच्या संघात सहभागी असलेल्या अमांडा वेलिंग्टन (Amanda Wellington) हिचा फोटो पाहून ही गोष्ट स्पष्ट होते. अमांडाने  तिच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिने दोन्ही हातांवर भारतीय परंपरेनुसार मेहंदी काढली आहे.

पोस्टमध्ये तिने एक फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये  तिने लिहिले की, “मला चंद्रावर पोहोचल्यासारखं वाटत आहे. कसा आला आहे रंग. खूपच सुंदर आहे, तुम्हाला काय वाटते?” कमांडा एक टॅटू लव्हर आहे आणि त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी टॅटू काढलेले आपण पाहू शकतो. अशात मेहंदी हा तिच्यासाठी वेगळा अनुभव आहे आणि ती खूपच आनंदी दिसत आहे.

Over the moon with how this turned out! So beautiful 🥰 what do you think? #Henna #india pic.twitter.com/4QyS1t49FV

— Amanda Wellington (@amandajadew) December 16, 2022

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या टी-20 मालिकेत शनिवारी ऑस्ट्रेलियने विजयी आघाडी मिळवली. मालिकेतील पहिला तिसरा आणि आता चौथा सामना ऑस्ट्रेलियन संघाने नावावर केला. दुसऱ्या सामन्यात मात्र भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली असून शेवटचा सामना 20 डिसेंबर रोजी मुंबईच्या ब्रेबॉन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अमांडाला मात्र या मालिकेतील एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तिने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 14 वनडे सामन्यांमध्ये 18, तर 8 टी-20 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. (Amanda Wellington gets mehndi on her hands)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘करियरकडे लक्ष दे…!’, रिकी पाँटिंगने कोणत्या खेळाडूला दिली चेतावनी?
केरळवासियांच्या प्रेमामुळे नेमारही भावून, आभार मानण्यासाठी केली खास पोस्ट 


Next Post
Bengaluru FC vs Jamshedpur FC

बंगळुरू एफसीचा सहज विजय; जमशेदपूर एफसीचा सलग सातवा पराभव

ML Jaisimha

तब्बल 505 मिनिटे फलंदाजी अन् 99 धावांवर बाद, वाचा गावसकरांच्या 'हिरो'च्या खेळीबद्दल सविस्तर

FC Goa vs NorthEast United FC

एफसी गोवाचा वर्चस्वपूर्ण विजय, नॉर्थ ईस्ट युनायटेडचा सलग दहावा पराभव

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143