पुणे, 16 डिसेंबर 2023: क्लिअर पुरस्कृत पाचव्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत पाचव्या दिवशी बेंगळुरू एसजी माव्हरिक्स, पंजाब पेट्रीएटस, बंगाल विझार्ड्स, दिल्ली बिनीज ब्रिगेड या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पाचव्या दिवशी दिल्ली बिन्नीज ब्रिगेड संघाने हैद्राबाद स्ट्रायकर्स संघाचा 41-39 असा पराभव केला. महिला एकेरीत दिल्लीच्या सहजा यमलापल्लीचा हैद्राबादच्या एलेन पेरेझचा 8-12 असा पराभव केला. पुरूष दुहेरीत हैद्राबादच्या निकी पोनाचाने दिल्लीच्या डेनिस नोव्हाकचा 12-8 असा पराभव करून ही आघाडी वाढवली. मिश्र दुहेरीत सहजा यमलापल्ली व जीवन नेद्दूचेझियन यांनी हैद्राबादच्या एलेन पेरेझ व साकेत मायनेनी यांचा 14-6 असा पराभव ही आघाडी कमी केली. पुरूष दुहेरीत दिल्लीच्या डेनिस नोव्हाक व जीवन नेद्दूचेझियन यांनी हैद्राबादच्या साकेत मायनेनी व निकी पोनाचा यांचा 11-9 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.जीवन नेद्दूचेझियन सामन्याचा मानकरी ठरला.
दुसऱ्या सामन्यात पंजाब पेट्रीएटस संघाने पुणे जॅगवॉर्स संघाचा 43-37 असा पराभव करून चौथा विजय मिळवला. यावेळी पंजाब पेट्रीएटस तापसी पन्नूने आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थिती लावली होती. विजयी संघाकडून कोनी पेरीन, दिग्विजय प्रताप सिंग, अर्जुन कढे यांनी सुरेख कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यात बेंगळुरू एसजी माव्हरिक्स संघाने मुंबई लियॉन आर्मीचा 46-34 असा तर शेवटच्या साखळी लढतीत बंगाल विझार्ड्स संघाने गुजरात पँथर्स संघावर 45-35 असा विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी:
दिल्ली बिनीज ब्रिगेड वि.वि.हैद्राबाद स्ट्रायकर्स 41-39 (महिला एकेरी: सहजा यमलापल्ली पराभुत वि.एलेन पेरेझ 8-12; पुरूष एकेरी: डेनिस नोव्हाक पराभुत वि.निकी पोनाचा 8-12; मिश्र दुहेरी: सहजा यमलापल्ली/जीवन नेद्दूचेझियन वि.वि. एलेन पेरेझ/साकेत मायनेनी 14-6; पुरूष दुहेरी: डेनिस नोव्हाक/जीवन नेद्दूचेझियन वि.वि. साकेत मायनेनी/निकी पोनाचा 11-9)
पंजाब पेट्रीएटस वि.वि.पुणे जॅगवॉर्स 43-37(महिला एकेरी: कोनी पेरीन वि.वि.डायना मर्सिनचेविका 14-6; पुरूष दुहेरी: दिग्विजय प्रताप सिंग पराभुत वि. लुकास रोसोल 7-13; मिश्र दुहेरी: कोनी पेरीन/अर्जुन कढे बरोबरी वि.डायना मर्सिनचेविका/रित्वीक बोलीपल्ली 10-10; पुरूष दुहेरी: दिग्विजय प्रताप सिंग/अर्जुन कढे वि.वि.रित्वीक बोलीपल्ली/लुकास रोसोल 12-8);
बेंगळुरू एसजी माव्हरिक्स वि.वि.मुंबई लियॉन आर्मी 46-34(महिला एकेरी: एरिना रोडीनोवा वि.वि.सौजन्या बावीशेट्टी 11-9; पुरूष एकेरी: रामकुमार रामनाथन वि. वि. अर्नेस्ट गुलबिस 15-5; मिश्र दुहेरी: एरिना रोडीनोवा / विष्णू वर्धन वि.वि.सौजन्या बावीशेट्टी/विजय सुंदर प्रशांत 11-9; पुरूष दुहेरी: रामकुमार रामनाथन/विष्णू वर्धन पराभुत वि.करण सिंग/विजय सुंदर प्रशांत 9-11);
बंगाल विझार्ड्स वि.वि.गुजरात पँथर्स 45-35(महिला एकेरी: मारिया तिमोफिवा पराभुत वि. एकतेरीना याशिना 11-9; पुरूष दुहेरी: श्रीराम बालाजी वि.वि.सुमित नागल 11-9; मिश्र दुहेरी: मारिया तिमोफिवा/अनिरुध्द चंद्रशेखर वि.वि.एकतेरीना याशिना/मुकुंद ससीकुमार 13-7; पुरूष दुहेरी: श्रीराम बालाजी/अनिरुध्द चंद्रशेखर पराभुत वि.सुमित नागल/मुकुंद ससीकुमार 8-12).
महत्वाच्या बातम्या –
रोहित मुंबई इंडियन्सची साथ सोडून आयपीएल 2024च्या लिलावात सामील होणार? वाचा सविस्तर
जेव्हा कॅप्टन्सीवरुन काढलं तेव्हा रोहित अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये काय करत होता?